मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची सुपाचीपुड- हरवळे पुरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली Twitter/ @pramod sawant
गोवा

Goa Rain: साखळी परिसरात महापूर; 23 जणांना वाचविण्यात यश

सध्या साखळी बाजारपेठेतील पुराचा धोका टळला. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सुपाचीपुड या पुरग्रस्त भागाची पाहणी केली.

Priyanka Deshmukh

पावसाने काल दिवसभर व रात्री रौद्रारुप धारण केल्याने साखळीतील वाळवंटी नदीला महापूर आला व पाणी साखळी परसरात शिरल्याने साखळी, हरवळे परिसर पुराच्या विळख्यात सापडला. साखळीतील दत्त मंदीर, क्रिडा मैदान, वाठारेश्वर देवस्थान, तसेच सुपाचे पुड हा गाव पाण्याखाली आला व लोकांची एकच तारांबळ उडाली. साखळी बाजारातील पुर नियंत्रक विभागातील पंप पुन्हा सुरु करुन पाणी नदीत फेकण्याचे काम सुरु केल्यामुळे साखळी बाजारपेठेतील पुराचा धोका टळला. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सुपाचीपुड या पुरग्रस्त भागाची पाहणी केली. (Chief Minister DrPramodPSawant inspected areas flooded due to incessant rains in various parts of Bicholim)

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची सुपाचीपुड- हरवळे पुरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली
साखळीचे दत्त मंदीर पाण्याच्या विळख्यात

दत्तमंदीर, तोणयेश्वर मंदीर, क्रीडा मैदान पाण्याखाली

साखळीत पाणी वाढल्यामुळे साखळी येथील दत्त मंदीर, म्हावळींगतडचे तोणयेश्वर मंदीर, साखळी बाजारातील पालिका क्रीडामैदान पाण्याखाली आले. त्यामुळे साखळी बसस्थानकावरून बाजारात जाणारा रस्ताच बंद झाला. हा संपुर्ण परिसर पाण्याने व्यापला गेल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली.

हरवळे- होंडा रस्त्यावर पाणी, वाहतूक वळवली

सुपाचे पुड - हरवळे गावात पाणी शिरल्याने नागरीकांची तारांबळ उडाली. पाणी हरवळे - होंडा या राज्य महामार्ग मुख्य रस्त्यावर आल्याने या मुख्य रस्त्याला जणू नदीचेच स्वरुप प्राप्त झाले. हा रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला. पोलिसांनी त्वरीत या ठिकाणी उपस्थित राहून हरवळे-होंडा मुख्य रस्त्यावरील वाहतूक हरवळे गावातून दुसऱ्या रस्त्याने वळवली. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी तत्काळ सकाळी सुपाचीपुड-हरवळे या भागाची पाहणी केली.

साखळी बाजारातील पाणी पुरवठा विभागाचा पुरनियंत्रक दोन्हीही पंप चालू केले.

पंप पुन्हा सुरु..मात्र बाजार सुरक्षित

पावसाळा सुरु झाला की साखळीतील पुराचा इतिहास डोळ्यांसमोर येतो. त्यामुळे साखळी बाजार परिसरातील लोकांना तीन महिने झोपच लागत नसते. यंदा तर मे मध्येच पाऊस सुरु झाला तो अद्याप थांबण्याची लक्षणेच दिसत नाही. काल रात्रभर पावसाने अक्षरशः थैमान माजवल्याने साखळी परिसरातील लोकांची झोपच उडाली. वाळवंटी नदीने रौद्ररुप धारण केले.वाळवंटी नदी तुडूंब भरण्याचा धोका वाढला.

साखळी येथील वाळवंटी नदी तुडुंब भरल्याने पुराचाधोका वाढला

साखळी बाजारातील नागरिकांमध्ये रात्री घबराट पसरली. बाजारपेठेतील सर्व नागरिक झोप मोडल्याने नागरिक बाजारात जमू लागले. पाणी वाढत चालल्याने साखळी बाजारातील पाणी पुरवठा खात्याच्या पुरनियंत्रक विभागाने रात्रीच पुन्हा एकदा दोन्हीही पंप सुरु करुन पाणी नदीत फेकण्याचे काम चालू केले. पाऊस आणखी तासभरही थांबला असता तर पाणी बाजारात शिरण्याचा धोका वाढला होता. पाऊस थोडा थांबल्यामुळे पाणी बाजारात आले नाही व बाजार सुरक्षित राहीला त्यामुळे बाजारातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी पावसाचा जोर पुढेही कायम राहण्याची संभवना असल्याने नागरिक अद्याप भयभीत अवस्थेतत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT