Ganesh Chaturthi Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Sumit Tambekar

आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गोव्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आपण सर्वजण यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरकरित्या साजरा करुया आणि पर्यावरणाचं रक्षण करुया असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

(Chief Minister Dr. Pramod Sawant wished the people of Goa on Ganesh Chaturthi)

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील गणेश उत्सव हा पर्यावरणपूरकच साजरा केला जातो असे म्हणत, यासाठी मोटोळीचं याचं उत्तम उदाहरण असल्याचं सांगितलं. कारण राज्यभरात मोटोळीसाठी वापरले जाणारे साहित्य हे संपूर्णपणे पर्यावरणपूरक असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातील निसर्गात मिळणारे साहित्य हे बाजारात उपलब्ध करुन दिले जाते.

पर्यावरणपूरक साहित्यच वापरत गणेशाची आरास केली जाते. असे ही आपली परंपरा कायम जपूया असे ही ते म्हणाले. केळीच्या पानासारखे निसर्गातील प्रत्येक घटक आपल्या या उत्सावात सामिल होत. आपल्या आनंदात भर घालतात असे ही ते म्हणाले.

यंदाची गणेश चतुर्थी पर्यावरणपूरक

शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण यंदाचा गणेशोत्सव स्वयंपूर्णरित्या 100 टक्के पर्यावरणपूरक साजरा करुया. म्हणून राज्यातील जनतेने उत्सव काळात वापरले जाणारे साहित्य हे अधिक - अधिक कसे पर्यावरणपूरक वापरण्यासाठी भर देऊ असे ही ते म्हणाले. म्हणूनच बाप्पाची मुर्ती ही देखील प्लॅस्टर ऑफ पॅरिसची न वापरता ती मातीची असेल याची खात्री करुया.

कारण मातीची मुर्ती ही पर्यावरणाला धोका करत नाही. त्यामूळे आपण ही सर्व काळजी घ्याल याची मला खात्री आहे असे ही ते म्हणाले. तसेच अगदी प्रसादासाठी वापरली जाणारी पत्रावळी देखील पर्यावरणपूरक वापरत आपल्याच भावा बहिनींच्या उद्योगांना हि हातभार लावत गोवा स्वंयपूर्ण करण्यासाठी हातभार लावूया असे ही ते यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT