केप्यातील लोकांपर्यंत सरकारी योजना पोहचविण्याचे काम केले आहे व त्याचे चांगले परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. ते केपे येथे ‘प्रशासन तुमच्या दारी’ या कार्यक्रमात बोलत होते.
मंत्र्यांना पाठवून लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा उपक्रम प्रथमच गोव्याच्या इतिहासात होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील लोकांसाठी घर, स्वच्छता, आर्थिक सुरक्षा, किसान कार्ड अशा अनेक सुविधा पुरविण्यासाठी ‘स्वयंपूर्ण मित्र’ची नेमणूक केली होती व यातून किमान 98% सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचल्या आहेत, असे सावंत यांनी सांगितले.
यावेळी केपेचे आमदार एल्टन डीकॉस्ता,माजी आमदार बाबू कवळेकर, कुडचडेच्या नगराध्यक्षा जसमीन ब्रागांझा,केपेच्या सुचिता शिरवईकर,जिल्हा पंचायत सदस्य खुशाली वेळीप, सिद्धार्थ देसाई,शाणू वेळीप, संजना वेळीप, मुख्य सचिव डॉ. व्ही.चंडा वेल्लू,दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले
सरकारी शाळांच्या नूतनीकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार
सरकारी जमिनींची होणारी लूट थांबवणार
केंद्र तसेच राज्य सरकारचे अंत्योदय तत्वावर काम
येत्या वर्षी कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करणार
कोविड काळात केंद्राकडून 80 कोटी लोकांना धान्य देऊन दिलासा
आज पंचायतींच्या कामाचा आढावा घेणार
उद्या दि.18 रोजी आयएएस व राज्य शासनाचे अधिकारी राज्यातील १९८ पंचायतीत जाऊन स्वयंपूर्ण मित्र व पंचायतीने केलेल्या कामाचा आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. लोकांना अनेक प्रश्न सतावत असतील, पण आमचे सरकार घर, वीज, पाणी व रस्ते या सुविधा पूर्ण करणार आहे, असे सावंत म्हणाले.
केपे मतदारसंघात अनेक कामे बाकी राहिली असून यात पिण्यासाठी पाणी व रस्त्यांचाही समावेश आहे. फातर्पा व बेतुल येथे पंचायत घर, सरकारी शाळांचे नूतनीकरण, केपे येथेल पालिका इमारतीचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे तसेच काराळी येथे बालोद्यान व जॉगिंग ट्रॅक ,क्रीडा मैदान ,रवींद्र भवन उभारून द्यावे.
-एल्टन डिकॉस्टा, आमदार केपे
राज्य सरकार लोकांसाठी काम करीत आहे. ‘प्रशासन तुमच्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री केपेतील लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आले आहेत.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार ज्या प्रमाणे काम करीत आहे, ते पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.
-बाबू कवळेकर, माजी आमदार केपे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.