54th IFFI: 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी(इफ्फी) ‘उद्याचे 75 सर्जनशील प्रतिभावंत’ या उपक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीसाठी देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील गुणवत्तावान चित्रपट निर्माते आणि कलाकारांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दिली.
‘इफ्फी’च्या आढावा बैठकीसाठी ते गोव्यात आले होते. त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह ''ईएसजी''च्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. मुरुगन म्हणाले यंदाचा ‘इफ्फी’ यशस्वी करण्यासाठी माहिती आणि प्रसारण खाते, एनएफडीसी सक्रिय आहे. यंदाच्या इफ्फीला देश विदेशातून मोठा प्रतिसाद मिळत असून ‘इफ्फी’ साठी 25 हजार प्रतिनिधी सहभागी होतील.
परीक्षक आणि महापरीक्षक पॅनेलकडून ‘उद्याचे ७५ सर्जनशील प्रतिभावंत’ या उपक्रमात निवड झालेल्यांची बहुप्रतिक्षित यादी जाहीर करण्यात आली आहे.
यात देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कलाकार आहेत. प्रामुख्याने आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, दिल्ली, गोवा, गुजरात, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
या प्रतिभावंतांत महाराष्ट्रातील निर्माते, कलाकारांची संख्या सर्वाधिक असून त्याखालोखाल दिल्ली, पश्चिम बंगाल, हरयाणा आणि तामिळनाडूमधील प्रतिभावंत आहेत.
मास्टरक्लास
दिग्दर्शनासंदर्भातील ‘मास्टरक्लास’मध्ये उमेश शुक्ला, चारुदत्त आचार्य, चारुवी अग्रवाल बर्लिनेल टॅलेंट्स कार्यक्रम व्यवस्थापक फ्लोरिअन वेघॉर्न मार्गदर्शन करतील.
या वर्षी पुन्हा एकदा आपल्याकडे ‘ उद्याचे 75 सर्जनशील प्रतिभावंत’ म्हणून देशभरातील 75 प्रतिभावंत आहेत. चित्रपटनिर्मिती स्पर्धेचा भाग म्हणून अतिशय उत्तम लघुपटांची निर्मिती होण्याची आम्ही अपेक्षा करत आहोत. निवड झालेल्या सर्वच विजेत्यांना विशेष नियोजन ेलेल्या ‘मास्टरक्लासेस’ आणि सत्रांमधून ज्ञान मिळेल.
दिग्दर्शन, पटकथा लेखन, िनेमाटोग्राफी, अभिनय, संकलन, पार्श्वगायन, संगीतकार, पोशाख आणि रुपसज्जा, कला रचना आणि ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्चुअल रियालिटी याविषयीच्या कौशल्यांचे मार्गदर्शन मिळेल. दिग्दर्शन क्षेत्रातील १८, ॲनिमेशन, व्हीएफएक्स, एआर आणि व्हीआर क्षेत्रामधील १३ आणि छायालेखन(सिनेमॅटोग्राफी) क्षेत्रातील १० कलावंतांचा यात समावेश आहे.
- अनुराग ठाकूर - केंद्रीय मंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.