Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे उपसभापती सुभाष फळदेसाई यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी सांगेचे भाजप आमदार सुभाष फळदेसाई यांची निवड झाली.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी सांगेचे भाजप आमदार सुभाष फळदेसाई यांची निवड झाली. त्यांना 24 तर काँग्रेसचे आमदार केदार नाईक यांना 15 जणांनी पाठिंबा दिला. काल दुपारच्या सत्रात ही निवडणूक घेण्यात आली. मुख्यमंत्री व विरोधी पक्षातील सभागृहाचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांनी त्यांना उपसभापतीच्या आसनावर नेऊन बसविले.

मंगळवारी सभापतीपदासाठी रमेश तवडकर यांची निवड झाल्यानंतर उपसभापती पदासाठी भाजपतर्फे आमदार सुभाष फळदेसाई व अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी तर काँग्रेसतर्फे आमदार केदार नाईक यांनी अर्ज दाखल केले होते.

मात्र, आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी अर्ज मागे घेतल्याने या पदासाठी दोन आमदारांमध्ये निवडणूक झाली. भाजप आघाडी सरकारकडे स्पष्ट बहुमत असल्याने सुभाष फळदेसाई यांची निवड अपेक्षित होती.मंत्रिपदासाठी शर्यतीत असलेले दक्षिण गोव्याचे भाजप आमदार रमेश तवडकर व आमदार सुभाष फळदेसाई यांची सभापती व उपसभापतीसाठी निवड झाल्याने सरकारला पाठिंबा दिलेल्या आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SAFF Championship: पाकिस्तानविना गोव्यात रंगणार 'सॅफ फुटबॉल स्पर्धा'; यजमान भारत, गतविजेत्या बांगलादेशसह एकूण सहा महिला संघांत चुरस

Omkar Elephant: 'ओंकार' पोचला उगाडे - सिंधुदुर्गात... सीमोल्लंघन सुरूच; पेडणे वन कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा

SCROLL FOR NEXT