Disability Empowerment Gomantak Digital Team
गोवा

Panaji : दिव्यांगजन आयोग कार्याचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार प्रयत्नरत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : राज्य दिव्यांगजन आयोगाचा 2022-2023 सालचा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते नुकताच प्रसिद्ध करण्यात आला.

यावेळी समाजकल्याण संचालनालयाच्या संचालक संध्या कामत, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर आणि आयोगाचे सचिव तहा हाजिक उपस्थित होते.

आयोगाची स्थापना झाल्यापासून आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने केलेल्या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या वार्षिक अहवालात ‘पर्पल महोत्सव’ व्यतिरिक्त दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे.

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार प्रयत्नरत आहे. याशिवाय गोवा राज्य दिव्यांगस्नेही बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सावंत यांनी यावेळी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT