CM Pramod sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod sawant: संघटनात्मक नेतृत्वाच्या परीक्षेतही मुख्यमंत्री पास

CM Pramod sawant: पक्ष प्रभारींचा पत्ताच नाही : सरकारला 33 आमदारांचे पाठबळ

दैनिक गोमन्तक

CM Pramod sawant: भाजपचे संघटन सचिव सतीश धोंड हे गोव्यातून पश्‍चिम बंगालमध्ये पाठविले गेल्यास दोन वर्षे लोटली असून निवडणुकीपूर्वी प्रभारी म्हणून सी. टी. रवी यांना पाठवले होते. सहा महिन्यांपूर्वी रवी यांचा कर्नाटक निवडणुकीत पराभव झाला.

त्यानंतर दिल्लीत संघटनात्मक जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या. प्रभारी नसल्याने पक्षाची संघटनात्मक जबाबदारीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर येऊन पडली आहे. विशेष म्हणजे, ते पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या जबाबदारीत यशस्वी झाले आहेत.

सी.टी. रवी हे प्रभारी असताना ते विश्‍वजीत राणे आणि रोहन खंवटे यांना निकट होते; व ते सावंत यांच्यासमोर काही कटकटीही निर्माण करीत असत. सध्या त्यांना प्रश्‍न विचारणारा कोणी नाही.

‘‘सध्या प्रमोद सावंत सरकारचे प्रमुख शिवाय संघटनेचे नेते म्हणूनही दुहेरी जबाबदारी पाहतात. त्यामुळे संघटनेतर्फे त्यांना जाब विचारणारेही कोणी नाही,’’ अशी माहिती एका नेत्याने ‘गोमन्तक’ला दिली.

कॉंग्रेस पक्षातून आठ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मूळ 20जणांचा असलेला भाजप विधिमंडळ पक्ष आता अधिकृतरित्या 28 सदस्यांचा बनला आहे. शिवाय त्यांना मगोपच्या दोघा सदस्यांचा पाठिंबा आहे. नंतर डॉ. चंद्रकांत शेट्ये, आलेक्स रेजिनाल्ड, ॲन्थनी वाझ या तीन अपक्षांनी पाठिंबा दिल्याने या सरकारला एकूण ३३ जणांचे पाठबळ आहे.

दिग्गज नेत्यांनाही ठेवले मुठीत

आमदारांच्या संख्येबरोबरच मुख्यमंत्र्यांची वाढती राजकीय ताकद लक्षात आल्याने गणेशोत्सवात त्यांच्या कोठंबी-साखळी येथील निवासस्थानी भेट देण्यासाठी आमदारांनी गर्दी केली होती. राजकीय बदलाची ही नांदी मानली जात असून कॉंग्रेस पक्षातून मंत्रिपदाचे आमिष दाखवून फोडून आणलेल्या आमदारांमध्ये असंतोष असून ते नांगी टाकून गप्प बसले आहेत. एका बाजूला विश्‍वजीत राणेंना शह देत दिगंबर कामत यांच्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षेला काबूत ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे कसब सध्या कौतुकाचा विषय ठरले आहे, असे पक्षातील राजकीय धुरीण मानतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT