MLA Shivaji Patil Dainik Gomantak
गोवा

Goa Chicken Shortage: गोव्यात 'बॉयलर चिकन'चा तुटवडा; महाराष्ट्रातील आमदार घालणार लक्ष, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

MLA Shivaji Sawant: कर्नाटक व महाराष्‍ट्रातून आवक बंद झाल्याने राज्यात चिकनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात निर्माण झालेल्या बॉयलर चिकन तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील आमदाराने पुढाकार घेतला आहे. राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून चिकनचा तुटवडा निर्माण झाला असून, महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी आता चंदगड, कोल्हापुरचे आमदार शिवाजी पाटील यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

आमदार शिवाजी पाटील यांनी गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन बॉयलर चिकन तुटवड्यावर चर्चा केली. चिकन तुटवड्याबाबत लवकरच महाराष्ट्र आणि गोवा पोल्ट्री असोसिएशनची बैठक होणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.

डिचोलीसह राज्‍याच्‍या अन्य भागांत कर्नाटक व महाराष्‍ट्रातून बॉयलर कोंबड्यांची आवक होत असते. पण, आवक बंद झाल्याने राज्यात चिकनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

गोव्यात प्रवेश करताना लागणाऱ्या चेकनाक्यावर ज्यादा पैशांची मागणी करून वाहतूकदारांची सतावणूक करण्यात येत आहे. या प्रकारामुळे वाहतूकदार संतप्त झाले असून, ते संपावर गेले आहेत. यामुळे बॉयलर कोंबड्यांची आवक बंद झाल्याने राज्यात चिकनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आवक कमी झाल्यामुळे बॉयलर चिकनच्या दरातही अचानक ३० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्‍यामुळे हा दर आता प्रतिकिलो १८० ते २०० रुपयांवर पोहोचला आहे. या प्रकरणात आता आमदार शिवाजी पाटील यांनी लक्ष घालण्याचे ठरवल्याने गोव्यातील चिकन तुटवड्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT