CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Chhaava Tax Free In Goa: शिवजयंती दिवशी प्रमोद सावंत सरकारचा मोठा निर्णय; गोव्यात छावा टॅक्स फ्री

CM Pramod Sawant on Chhaava Tax Free: शिवजयंतीच्या (19 फेब्रुवारी) मुहूर्तावर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'छावा' चित्रपटासंबंधी मोठी घोषणा केली. गोव्यात 'छावा' करमुक्त (टॅक्स फ्री) करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

Manish Jadhav

Chhaava Movie Tax Free In Goa: 'छावा' या संभाजी महाराजांवरील चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या हृदयावर ठसा उमटवत आहे. दमदार कथा, उत्कट अभिनय आणि प्रभावी संवाद यामुळे हा चित्रपट चर्चेत आहे. गोव्यातही 'छावा'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. याचदरम्यान आता शिवजयंतीच्या (19 फेब्रुवारी) मुहूर्तावर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'छावा' चित्रपटासंबंधी मोठी घोषणा केली. गोव्यात 'छावा' करमुक्त (टॅक्स फ्री) करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. डिचोली येथील शिवजयंती सोहळ्यात बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्री सावंत काय म्हणाले?

धर्मासाठी जगणं कसं, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, तर धर्मासाठी मरण कसं स्वीकारावं, हे धर्मवीर संभाजी महाराज यांनी शिकवलं. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगून, धर्मवीर संभाजी महाराजांच्या धाडसी जीवनाची आजच्या पिढीला जाणीव व्हावी, यासाठी त्यांच्या जीवनावरील 'छावा' चित्रपट उद्यापासून (गुरुवारी) गोव्यातील (Goa) चित्रपटगृहातून करमुक्त करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी केली.

महाराजांमुळे धर्म आणि संस्कृती शाबूत राहीली

स्वराज्य आणि सुराज्य स्थापन करण्याचा ध्यास घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांच्यामुळेच धर्म आणि संस्कृती शाबूत राहिली. शिवरायांचे गुण आणि आदर्श अंगीकारुन देशाला सुराज्य करण्यासाठी प्रत्येकाच्या योगदानाची गरज असल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डिचोली नगरीत शिवजयंती सोहळ्यात हजारो शिवप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

भारत देशाला सुराज्य बनवायचे

शिवरायांचे गुण आणि आदर्श अंगीकारुन देशाला सुराज्य करण्यासाठी प्रत्येकाच्या योगदानाची गरज आहे. भारत देशात सुराज्य यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केले. बुधवारी (19 फेब्रुवारी) रात्री येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित या सोहळ्याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, उपनगराध्यक्ष दीपा पळ, अन्य नगरसेवक, पालिकेचे मुख्याधिकारी नेहाल तळवणेकर, 'वेदांता'चे उप मुख्यअधिकारी धीरजकुमार जगदीश तसेच विविध पंचायतींचे सरपंच, पंच तसेच भाजप आणि शिक्षा व्हिजनचे पदाधिकारी उपस्थित होते.

गोमंतकीयांचा 'छावा'ला भरभरुन प्रतिसाद!

दरम्यान, विकी आणि रश्मिकाच्या या चित्रपटाला गोमंतकीयांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्यासह सरकारमधील वरिष्ठ मंत्री छावा चित्रपट पाहण्याचे आवाहन गोमंतकीय तरुणांना करत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास भव्य स्वरुपात उलगडणारा हा चित्रपट केवळ युद्धाची शौर्यगाथा सांगत नाही, तर त्यांची बुद्धिमत्ता, राज्यकारभारातील कौशल्य आणि स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले बलिदानही अधोरेखित करतो.

शेजारच्या महाराष्ट्रात छावा टॅक्स फ्री करण्याची मागणी

दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून शेजारील महाराष्ट्रात देखील छावा करमुक्त करण्याची मागणी राज्यातील विविध संघटना आणि पक्षांकडून करण्यात येत आहे. याचसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वक्तव्य केले.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात (Maharashtra) करमणूक करच नाही. इतर राज्येच जेव्हा एखादा चित्रपट करमुक्त करतात तेव्हा ते मनोरंजन कर माफ करतात. पण 2017 मध्येच महाराष्ट्राने करमणूक कर रद्द केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रत्येकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते आम्ही करु

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT