Goa CM Pramod Sawant In Chhattisgarh Dainik Gomantak
गोवा

Chhattisgarh: येत्या 5 वर्षांत गोवा राज्यावरील कर्जाचा बोजा कमी करणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्याची अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येऊ लागली आहे : मुख्यमंत्री

Rajat Sawant

Goa CM Pramod Sawant In Chhattisgarh: चांगल्यारितीने आर्थिक व्यवस्थापन करुन येत्या 5 वर्षांत गोवा राज्यावरील कर्जाचा बोजाही कमी होणार आहे. राज्यात पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यासाठी सेबी, नाबार्ड यांच्याकडून कमी व्याजदरात कर्ज घेत आहोत. राज्याची अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येऊ लागली आहे असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

छत्तीसगढमध्ये भाजपची परिवर्तन यात्रा सुरु असून 85 विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत सध्या छत्तीसगढ दौऱ्यावर आहेत.

छत्तीसगढ दौऱ्यावर असताना रविवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना स्थानिक पत्रकारांनी गोव्यातील अर्थव्यवस्थेवर आधारित प्रश्न विचारला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "गोवा राज्यातील खाण व्यवसाय 10 वर्षांसाठी बंद होता तसेच कोरोना काळात पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता."

"दरम्यान, आता पुन्हा एकदा गोव्यातील खाण व्यवसाय सुरु झाला आहे. तसेच पर्यटन व्यवसायही चांगला सुरु आहे. राज्यात सार्वजनिक खाजगी भागीदारीत आम्ही मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे".

"मोपा विमानतळामुळे सरकारला 37 टक्के महसूल मिळत आहे. आर्थिक व्यवस्थापन करुन राज्यावरील कर्ज 5 वर्षांत कमी करु" असे सांगितले.

यूनिफॉर्म सिविल कोड बाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, "यूनिफॉर्म सिविल कोडचे मी स्वागत करतो. गोवा राज्यात यूनिफॉर्म सिविल कोड गोवा मुक्ती संग्रामापासून चालत आला आहे. राज्यातील सर्व धर्मीय यूनिफॉर्म सिविल कोडचे स्वागत करतात. भारतात यूनिफॉर्म सिविल कोड लागू करण्याच्या मागणीचे मी स्वागत करतो" असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘गोव्याच्या कथा चित्रपटामार्फत जगभर पोहोचत आहेत, याचे श्रेय तरुण दिग्दर्शकांना'; अभिनेत्री सोबिता कुडतरकर यांचे प्रतिपादन

IND vs WI: भारताचा वेस्ट इंडिजला 'व्हाईटवॉश'! दुसऱ्या कसोटीत 7 विकेट्सने लोळवलं; 'हे' 4 खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

Purple Fest: दिव्यत्वाची प्रचिती! 'पर्पल फेस्ट'चा जोश, उत्साह आणि आनंद

Economic Update Goa : सहकारी सोसायट्यांची ‘घाेडदौड’! सहकारमंत्री शिरोडकरांनी दिली माहिती; एका वर्षात 3612 कोटींची आर्थिक उलाढाल

Goa Politics: 'गोव्यातील जनतेला विरोधी पक्षांची आघाडी हवी आहे', विरियातोंचा दावा; केजरीवालांची कॉंग्रेसवरील टीका मात्र अनाकलनीय

SCROLL FOR NEXT