Chhatrapati Sambhaji Maharaj Statue In Vasco Goa
वास्को: छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा वास्को शहरात उभारण्यात आला आहे. वास्कोतील शिवप्रेमी आणि शंभूभक्तीने एकत्र येत महाराजांचा पुतळा उभारला आहे. वास्को पालिकेच्या जवळ आज (शनिवार, १५ फेब्रुवारी) या पुतळ्याचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार कृष्णा साळकर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यात आली. "आपल्या शूर हिरोंचा इतिहास आणि वारसा सांगणारे असे शिल्प उभारले जावेत, जेणेकरुन त्यांचे शौर्य आणि त्याग याची युवा पिढीला माहिती मिळेल. तसेच, त्यांनी दिलेला स्वातंत्र्यलढा देखील युवा पिढीपर्यंत पोहोचेल", असे आमदार साळकर म्हणाले.
वास्कोत उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा हा पहिलाच पुतळा आहे. देशाचा इतिहास आणि वारसा सांगणाऱ्या अशा गोष्टी करण्यासाठी नेहमीच समर्थन असेल, असे आमदार साळकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, वास्कोचे नाव बदलण्याची मागणी देखील संभाजी महाराजांच्या नावाने करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. वास्को या नावावरुन काही हिंदू संघनांनी यापूर्वी आक्षेप नोंदवला होता.
सध्या विकी कौशल अभिनित छावा चित्रपटाची सर्वत्र धूम आहे. देशभरातून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातून मोठ्या प्रमाणावर चाहते संभाजी महाराजांची शौर्यागाथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. अशात वास्कोत संभाजी महाराजांचा पुतळा उभारुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.