Chess Tournament 2023 : डिचोली येथे पार पडलेल्या सहाव्या बॅटल ऑफ माईंड्स राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत नीरज सारीपल्ली याने विजेतेपद पटकावले. डिचोली बुद्धीबळ संघटनेच्या सहकार्याने डिचोली रोटरी क्लबतर्फे झांट्ये महाविद्यालयाच्या क्रीडा संकुल सभागृहात वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती.
या स्पर्धेत दीडशे स्पर्धेकांनी भाग घेतला होता.स्पर्धेतील अन्य विजेते पुढीलप्रमाणे - आर्यन रायकर, बॅस्टस्त्रकोव्ह दिमत्री, श्रिया पाटील, दत्ता कांबळी, मयुरेश देसाई, आयुष नाईक, वैष्णवी परब, हृदय मोरजकर, साईमा गावकर, अथर्वा शिरोडकर, लिया सिल्वेरा, मयंक कुर्टीकर, गौरेश नाईक आणि आदर्श पटेकर. वरिष्ठ गट - किरण चोपडेकर. सात वर्षांखालील गट - नारायण प्रभुदेसाई आणि सार्थक नाईक.
नऊ वर्षांखालील गट - ऋषित गावस आणि विहान तारी. अकरा वर्षांखालील गट - इथान सिल्वेरा आणि तपस्या भट. तेरा वर्षांखालील गट- वेदांत आंगले आणि क्षितिज नाईकगावकर. पंधरा वर्षांखालील गट - प्रतीक मालवणकर आणि मंथन कवठणकर.
आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. यावेळी सम्राट क्लबचे अध्यक्ष सरगम फळारी, विराज शिरोडकर, विवेक पोपकर, प्रदीप लाड, दामोदर प्रभू, सचिन साळकर, रामानंद नाटेकर, नरहरी सावंत आणि सत्यवान हरमलकर उपस्थित होते.
मुलींचेही नेत्रदीपक यश
मुलींच्या गटात वानिया दुकळे, तृषा पटेकर, कृतिका अगरवाल, स्कायला रॉड्रिगीस, नव्या नार्वेकर, विधी नाईक, सिद्धी नाईक, रिद्धी गावडे, आर्या डुबळे आणि विराजा देसाई यांना तर डिचोली तालुका मर्यादित स्पर्धेत स्नितीक सिनारी, यतार्थ देसाई, वेदांत मार्शल, पीयूष मालवणकर,
आश्वथ नावेलकर, साईप्रसाद कोरगावकर, आदर्श नाईक, शुभम नेसवणकर, रोहिश च्यारी, तनिष्क नाईक, स्मृती मालकर, आद्या नार्वेकर, तन्वी कोरगावकर, श्रेया साळगावकर आणि वैष्णवी पाटील यांना बक्षिसे मिळाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.