Goa Police
Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: बॉम्बस्फोट धमकी; चेन्नई पोलिस गोव्यात

दैनिक गोमन्तक

Goa Police:

परराज्‍यातील शैक्षणिक आस्‍थापनांवर हल्‍ला केला जाणार अशातरेचे ई-मेल आल्‍यामुळे सध्‍या खळबळ माजली असून त्‍यात गोव्‍यातील काही व्‍यक्‍तींची नावेही गोवली गेल्‍याने त्‍यातील गूढ अधिक वाढले आहे. यासंदर्भात तपास करण्‍यासाठी चेन्नई येथील एक पोलिस पथक मडगावात दाखल झाले असून या पथकाने तपासाला सुरुवात केल्‍याची माहिती मिळाली आहे.

तामिळनाडू येथील काही शाळा बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल गोव्यातून पाठविण्यात आल्याने, त्याचा तपास करण्यासाठी चेन्नईचे पोलिस गोव्यात दाखल झाले होते.

गोव्यातील एकूण पाच व्यक्तींची नावे या पोलिस पथकाकडे असून त्यांनी यापैकी काहीजणांच्या चौकशीला गुरुवारी प्रारंभ केला आहे.

चेन्नईच्या पोलिसपथकात पोलिस निरीक्षकासह सायबर क्राईमचे चार पोलिस तपासकार्यात गुंतले आहेत. ज्यांच्याकडून शाळा बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याचा ई-मेल गेल्याचा संशय आहे, त्यांच्याकडून मोबाईल, संगणक इत्यादीची तपासणी करण्यात आली.

चेन्नईतील पोलिस दाखल झाले आहेत, ही जरी गोष्‍ट खरी असली तरी या प्रकरणाबद्दल कुठलीही माहिती नाही, असे यासंदर्भात स्‍थानिक पोलिसांनी सांगितले. गोव्यातील पाच व्यक्तींची नावे ई-मेल पाठविणाऱ्यांत असल्याने तपासकामाचा एक भाग म्हणून हे पथक गोव्यात दाखल झाले आहे.

मडगावसहीत गोव्यात चार-पाच ठिकाणी भेट देऊन तपास करीत आहेत. बॉम्बस्फोट घडवून तामिळनाडूतील शाळा उडवून देणारा ई-मेल गोव्यातून पाठविला असल्याने गोव्यातील पोलिस यंत्रणाही गोंधळून गेली आहे. गोव्यात आजपर्यंत असा प्रकार कधीच घडलेला नाही.

मात्र, गोव्यातील व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून प्रगत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अन्य कुणी ई-मेल पाठविला असावा, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार!

याप्रकरणी गोव्यासहित देशातील अन्य राज्यांतही तपास सुरू असल्याची माहिती चेन्नई पोलिसांनी दिली. अन्य राज्यातूनही अशाच प्रकारचे ई-मेल तामिळनाडूतील शाळांना आल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वांची माहिती गोळा केल्यानंतरच आम्ही ई-मेल पाठविणाऱ्याच्या मुळापर्यंत जाऊ शकतो, असेही या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले. शाळा उडवून देणारा ई-मेल फेब्रुवारी २०२४ मध्ये शाळांना मिळाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Rush At Morjim Beach: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी; पर्यटकांसह स्थानिकांचीही वळली पावले

Goa Rain : आला पावसाळा...काळजी घ्या, आरोग्य सांभाळा; डेंग्यू, मलेरियाबाबत जागृती आवश्‍यक

Tiswadi News : तिसवाडीत मध्यरात्री दीड तास बत्तीगुल; ११० केव्ही केबल तुटली

Crime News : नोकरीच्या बहाण्याने विनयभंग; संशयिताला बंगळुरूमध्ये अटक

Panaji News : वेश्या व्यवसायातील २१ कोटी हवालाद्वारे परदेशात; मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT