Chemical spraying Dainik Gomantak
गोवा

‘सोनसोडोवर रासायनिक फवारणी करा'

आलेक्स रेजिनाल्ड: आरडीएफची दुर्गंधी टाळण्याची सूचना

दैनिक गोमन्तक

मडगाव: कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आज सकाळी मडगाव पालिका अधिकाऱ्यांसमवेत सोनसोडोला भेट दिली व तेथील एकंदर स्थितीची पाहणी केली. तेथील आरडीएफ हटविताना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी फैलावते,अशा तक्रारी राय व कुडतरीतील लोकांकडून आल्याने त्यांनी तेथील स्थितीचा आढावा घेतला.त्यांनी यावेळी पालिकेला आरडीएफवर रासायनिक फवारणी करण्याची सूचना केली.

सोनसोडो समस्या सोडविण्यासाठी एक विस्तृत बैठक बोलावण्याचे संकेत त्यांनी दिले. आजवर ज्या ज्या सरकारांनी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला त्यांना आपण पाठिंबा दिला. आता आपण सरकारचा भाग असू व सोनसोडो समस्या सोडवणे हा आपला प्राधान्यक्रम असेल,ते म्हणाले.

दरम्यान, रेजिनाल्ड यांनी आज सकाळी कुडतरीतील शेतक-यांची बैठक घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी लवकरच कृषी व जलस्त्रोतसह सर्व संबंधित खात्यांची बैठक बोलावून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या नव्या हंगामापूर्वी सोडविण्याचेआश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'फोंड्याला पोरका समजू नका'! CM सावंतांचे भावनिक आवाहन; घरे कायदेशीर करून देणार असल्याची दिली ग्वाही

Bondla Sanctuary: प्रतिक्षा संपली! बोंडलामध्ये दिसणार 'अस्‍वल' आणि 'हरीण'; छत्तीसगड, महाराष्‍ट्रातून होणार आगमन

Goa Crime: पोलीस असल्याचे भासवून पर्वरी महामार्गावर अडवली गाडी, 8 लाख लुटले; इराणी गँगमधील संशयिताला पुण्यातून अटक

Goa Murder Case: गाडी सापडली कणकवलीत, संशयितांकडून बेदम मारहाण; पीर्ण येथील खूनप्रकरणाचा वाचा घटनाक्रम..

Ind Vs SA: भारत की आफ्रिका! 'टॉस' ठरणार निर्णायक? महिला क्रिकेट टीम स्वप्नपूर्तीचा उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT