First Russian Charter Landed On Mopa Airport Goa Dainik Gomantak
गोवा

Russian Tourist Goa: गोव्यात रशियन पर्यटकांचे आगमन; मोपावर दोन चार्टर विमानं दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Tourist Season in Goa

मोपा: रशियामधून गोव्यातील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या पहिल्या थेट एरोफ्लॉटमुळे राज्यात चार्टर हंगाम सुरु झाला आहे. रशियामधून आज सकाळी ८ आणि ९ च्या सुमारास ३५० प्रवासी घेऊन ही विमानं मोपा येथे उतरली.

पैकी पहिल्या विमानात २१० पर्यटक होते आणि दुसऱ्या विमानात १३९ पर्यटकांचा समावेश होता. परदेशातून आलेल्या या विमानांमुळे गोव्यात खऱ्या अर्थाने पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे.

ऑक्टोबर महिन्यात अशा पाच साप्ताहिक विमानसेवेची सोय करण्यात आली आहे आणि गरजेनुसार ही सेवा वाढवून दर आठवड्याला सहा देखील केली जाऊ शकते. गोव्यात ही विमानं मॉस्को आणि येकातेरिनबर्गहून आली आणि या विमानसेवेचे व्यवस्थापन काँकॉर्ड एक्झोटिक व्हॉयेजेस (I) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून पहिले जाते.

चार्टर विमानसेवा म्हणजे काय?

पर्यटन हंगामात चार्टर विमानसेवा सर्वाधिक उपलब्ध असते. चार्टर सेवेतून दिली जाणारी विमानसेवा दररोजच्या विमानसेवेचा भाग नसते. एखाद्या विशिष्ट प्रवासासाठी या विमानांची सोय केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: मुसळधार पावसामुळे पाचवीत शिकणारा शाळकरी मुलगा बुडाला!

Rashi Bhavishya 17 October 2024: मनासारखी कार्ये होतील, धनलाभ होईल; अनेकांची मने जिंकत आनंदाने आजचा दिवस घालवाल

Goa News: अमित पाटकर यांच्याकडून TCP मंत्री आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल!!

Goa Diary: एकेकाळी फेणीसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव आज बनलंय पर्यटकांचं केंद्र, कोरोनानंतर हा बदल कसा घडला?

गोव्यातील रस्ता सुरक्षा सप्ताह! 'उपक्रम' की जबाबदारी 'लोकांवर' ढकलण्याचा उद्योग

SCROLL FOR NEXT