म्हापसा: अमली पदार्थ विरोधी कारवाई करताना हणजूण पोलिसांनी छापा टाकत, एका संशयिताकडून 25 हजाराचा चरस जप्त केला. नियाज खादर (28, आसगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
(Charas seized at Anjuna one Arrested)
एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या माहितीनुसार, हणजूण पोलिसांनी संशयिताकडून 11.09 ग्रॅम चरस जप्त केला. ज्याची किंमत 25 हजार रुपये इतकी आहे. संशयित हा हणजूण येथे ड्रग्स पुरविण्यासाठी आलेला. ही कारवाई सोमवारी (ता.5) आसगाव येथे गणपती मंदिरानजीक करण्यात आली.
हणजूण पोलिसांनी एनडीपीएस कायद्याच्या कलम 22(ब)(2)(अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, संशयित सध्या पोलिस कठोडीत आहे. पोलिस निरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज देविदास हे पुढील तपास करीत आहेत.
अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ब्रिटिश नागरिकाला अटक
अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ब्रिटिश नागरिकाला अटक करण्यात आली आहे. पेडणे पोलिसांनी मधलावाडा हरमल येथे छापा टाकून त्याला अटक केली आहे. या ब्रिटिश नागरिकाकडून वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत, पोलिसांनी तब्बल 15.48 लाखांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.स्टेफन स्लोटविनर (वय 76) असे अटक केलेल्या ब्रिटिश नागरिकाचे नाव आहे. अटक आरोपीकडे 12.2 ग्रॅम गांजा, दीड लाख रूपयांच्या चाळीस अंमली गोळ्या, 26 एलएसडी अंमली पदार्थ तसेच, एमडीएमए आणि एलएसडी कॅप्सूल अशा एकूण 15 लाख 48 हजार रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ब्रिटिश इसम भाड्याच्या घरात राहत होता. पोलिस अधिक तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.