Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

स्वच्छ चारित्र्याचे पंच सदस्य निवडून द्या

आगोंद पंचायत क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन : सभापती तवडकर

दैनिक गोमन्तक

आगोंद : निवडणूक आयोगातर्फे पंचायत निवडणुकांची तारीख जाहीर केल्यानंतर काणकोण तालुक्यातील सातही ग्रामपंचायत क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीस सुरवात केली आहे. स्थानिक आमदार व सभापती रमेश तवडकर यांनी काल आगोंद स्पोर्ट्स क्लबच्या सभागृहात या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत आगामी पंचायत निवडणुकीत स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी स्वच्छ चारित्र्याचे पंच सदस्य निवडून देण्याचे आवाहन केले.यावेळी व्यासपीठावर दक्षिण गोवा भाजपा उपाध्यक्ष महेश नाईक, मंडळाचे उपाध्यक्ष शाबा नाईक गावकर, सचिव संजीव तिळवे, क्लबचे अध्यक्ष किरण नाईक गावकर आदी उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांत घर क्रमांक व अन्य दस्तावेज प्राप्त करण्यासाठी येथील नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. हे सगळे बंद करण्यासाठी इमानदार व चारित्र्यवान पंच सदस्य निवडून येणे गरजेचे आहे. या मतदारसंघातील अनेक प्रश्न येणाऱ्या काळात सोडविण्यासाठी ‘काणकोण व्हिजन आणि मिशन’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असेही तवडकर पुढे म्हणाले.

पंचायत क्षेत्रात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. त्यासाठी चावडी ते खोला भूमिगत वीजवाहिन्या घालण्याच्या कामाला सभापतींनी गती देण्याची गरज असल्याचे यावेळी किरण नाईक गावकर यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत काशिनाथ फळदेसाई, मोतीलाल पागी, संजू नाईक देसाई, संभाजी नाईक गावकर, आनंदराव देसाई, रूपा पागी, राजेश बांदेकर, उल्हास नाईक गावकर व यांनीही भाग घेतला. नितीन देसाई यांनी सूत्रसंचालन केले व त्यांनीच आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT