Chapora Jetty Dainik Gomantak
गोवा

Chapora Jetty: ऐंशीवरुन फक्त तेरा मच्छीमार ट्रॉलर्स; शापोरा जेटीकडे अक्षम्य दुर्लक्ष

Chapora Jetty: पौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्रात सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर बोट असोसिएशनचे अध्यक्ष मालवणकर स्थानिक पत्रकारांशी बोलत होते

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुट: एकेकाळी शापोरा जेटीवरून ऐंशीहून अधिक मच्छीमार ट्रॉलर्स समुद्रात मासेमारीसाठी जात असत, परंतु सरकारने दाखविलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आजच्या घडीस केवळ तेरा मच्छीमार ट्रॉलर्स समुद्रात सोडले जात आहेत. ही परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात येथील जेटी केवळ इतिहास बनून राहणार असल्याचे शापोरा बोट असोसिएशनचे अध्यक्ष बलभीम मालवणकर यांनी सांगितले.

वर्ष पद्धतीप्रमाणे नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर येथील समुद्रात सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर मालवणकर स्थानिक पत्रकारांशी बोलत होते. यावेळी हणजुण-कायसुवच्या माजी पंच शरद नाईक, शापोरा फिशींग बोट असोसिएशनचे माजी चेअरमन शेखर दाभोलकर तसेच स्थानिक मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी गेल्या वर्षी नारळी पौर्णिमेला जेटीला भेट देत जेटीच्या पुनर्निर्माणाची मोठमोठी आश्वासने दिली होती, परंतु यंदा ते शापोरा भेटीवर येणेही विसरले, असे शेखर दाभोलकर यांनी सांगितले. आमदार-मंत्री येतात आणि आश्वासनांची खैरात वाटतात, मात्र जेटीची स्थिती जैसे थेच असल्याचे दाभोलकर यांनी सांगितले.

यावेळी चेअरमन बलभीम मालवणकर यांच्या हस्ते सोन्याचा नारळ समुद्रात सोडण्यात आला व पुरोहितांच्या उपस्थितीत सामुहिक प्रार्थना करण्यात आली.

दुटप्पीपणा का...?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत एका बाजूने मच्छीमार व्यवसाय गोमंतकीयांच्या हातून निसटणार असल्याची चिंता व्यक्त करतात व स्थानिक तरुणांना या व्यवसायात येण्याचे आवाहन करतात तर दुसऱ्या बाजूने स्थानिक मच्छीमारांच्या ताब्यात असलेल्या राज्यातील एकमेव शापोरा जेटीच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, असा दुटप्पीपणा शापोराच्या बाबतीत का केला जातो, असा संतापजनक सवाल मालवणकर यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर'

Goa Politics: "एकटा लढेन, मागे फिरणार नाही",पक्ष तिकीट न मिळाल्यास 'स्वतंत्र' लढणार; डॉ. केतन भाटीकर यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT