Chaos In Taleigao during Goa Elections 2022 Dainik Gomantak
गोवा

संथगतीने मतदानामुळे ताळगावात मतदार आक्रमक

पोलिंग बूथबाहेर सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासूनच ठिकठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून येत आहे. मात्र काही ठिकाणी मतदानावेळी गालबोट लागल्याचीही माहिती आहे. ताळगाव मतदारसंघात मतदार आक्रमक झाल्यामुळे तणाव पाहायला मिळाला आहे. (Chaos In Taleigao during Goa Elections 2022 News Updates)

ताळगाव (Taleigao) मतदारसंघात पीडब्यूडी पोलिंग बूथवर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली आहे. मात्र मतदानाचं काम संथगतीने चाललं असल्याने मतदार आक्रमक झाले आहेत. मतदानाला वेग नसल्याने मतदारांच्या बूथवर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. त्यामुळे मतदारांनी (Voters) आक्रमक पवित्रा घेतल्याचं चित्र आहे.

दरम्यान मतदानावेळी नावेली मतदारसंघातही तणाव पाहायला मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराच्या भावाने मुस्लिम बांधवांना अपमानजनक शब्द वापरल्याने काहीकाळ तणावपूर्ण वातावरण होतं. नावेलीतील हाऊसिंग बोर्ड परिसरात ही घटना घडली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून (Police) लाठीचार्ज झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT