Panjim Carnival 2022 Dainik Gomantak
गोवा

वास्कोत होणाऱ्या कार्निवल परेडनिमित्त पार्किंग व्यवस्थेत बदल

वाहतूक पोलिस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को येथे सोमवारी दिनांक 28 रोजी होणाऱ्या कार्निवल परेडनिमित्त वास्को शहरातील वाहतूक तसेच पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आले असल्याचे वाहतूक पोलिस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांनी पत्रकाद्वारे माहिती देताना सांगितले.

वास्को कार्निवाल समितीतर्फे वास्कोत आज रविवार पासून कार्निव्हलची धूम सुरू झाली असून मुरगाव नगरपालिके समोर उभारलेल्या रंगमंचावर कार्निवल निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन मुरगाव पालिका (Mormugao) मुख्याधिकारी जयंत तारी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कटीयाल यांच्या उपस्थितीत कार्निवल फ्लोट परेडला सुरूवात होणार आहे. त्यानिमित्त वास्को शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

फ्लोट परेड सेंट ॲंड्रूज चर्च जवळील लिना हॉटेल जंक्शन कडून मार्गस्थ होणार असून त्यानंतर स्वतंत्रपथ मार्गावरून दामोदर मंदिर, वास्को रेल्वे स्थानक ते आयओसी जंक्शन जवळ सांगता होईल. या दरम्यान सोमवारी दुपारी 12.45 ते रात्री 11 वाजेपर्यंत ट्रक, टँकर, ट्रेलर वाहनांची वाहतूक आय ओसी जंक्शन जवळ थांबवली जाईल.फ्लोट परेड पाहण्यासाठी येणाऱ्या वाहन चालकांना तानिया हॉटेल समोरील मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या दरम्यान स्वतंत्रपथ मार्ग कार्निवल होईपर्यंत दुपारी 1 वाजल्यापासून बंद ठेवण्यात येईल. स्वतंत्रपथ आणि एफ एल गोम्स अंतर्गत मार्गावर चारचाकी आणि दुचाकी पार्किंग व्यवस्था केली जाईल. स्वतंत्रपथ रस्त्यावरून जाणारी वाहनांची वाहतूक या दरम्यान एफ एल गोम्स मार्गावरून मार्गक्रमण करेल. तसेच वास्को शहरात प्रवेश करणारी अवजड वाहने शांतीनगर मार्गे वरुणापुरी कडे वळवली जाईल.

यादरम्यान ठक्कर हाऊस चर्च जंक्शन ते लीना हॉटेलपर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या पार्किंग नसेल. तसेच स्वतंत्रपथ फ्लोट परेड मार्गावर सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून पार्किंग करण्यास बंदी घातली आहे. त्यानुसार वाहन चालकांनी त्या मार्गावर पार्किंग न करण्याचे आवाहन वाहतूक पोलिस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांनी केले आहे. सर्व वाहनधारकांनी व सर्वसामान्य जनतेने सहकार्य करून पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन यावेळी नार्वेकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT