Goa DGP Alok Kumar Addressing Media Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan: नऊ दिवसांत 8 ठिकाणं बदलली, कसा अडकला सुलेमान पोलिसांच्या जाळ्यात? पत्नीवरही अटकेची टांगती तलवार

Suleman Khan Arrest: पोलिसांनी सुलेमान खानसोबत त्याची पत्नी अफ्साना हीला देखील ताब्यात घेतले आहे.

Pramod Yadav

पणजी: आयआरबी कॉन्स्टेबलच्या मदतीने गुन्हे शाखेच्या कोठडीतून फरार झालेल्या सिद्दीकी उर्फ सुलेमान खानला अखेर अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांना टीप मिळाल्यानंतर एर्नाकुलम, केरळ येथून त्याला शनिवारी (२१ डिसेंबर) अटक केल्याची माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली. गेल्या नऊ दिवसांपासून सुलेमान गोवा पोलिसांना गुंगारा देत होता. केरळमधून त्याला गोव्यात हजर करण्यात आले आहे.

सुलेमान खानच्या अटकेसाठी ७० पोलिसांच्या १४ टीम विविध राज्यात शोध घेत होत्या. अखेर शनिवारी त्याला अटक करण्यात आली. सुलेमान अट्टल गुन्हेगार असून, सुरक्षितपणे गोव्यात आणेपर्यंत त्याच्या अटकेची माहिती कोणालाही देण्यात आली नाही, असे अलोक कुमार यांनी सांगितले. सुलेमानच्या अटकेची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्यानंतर अलोक कुमार यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन अटकेची माहिती. गोव्यातील जमीन हडप प्रकरणातील अट्टल गुन्हेगार सुलेमान खान विरोधात १३ गुन्हे नोंद आहेत.

नऊ दिवसात आठ ठिकाणे बदलली

सुलेमान खानने फरार झाल्यानंतर नऊ दिवसांत आठ ठिकाणे बदलल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तपासात त्याच्या घरातून महत्वाची कागदपत्रे आणि पुरावे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्या घरातून १६ पासबूक, अनेक आधारकार्ड, १२ फोन, १३ चेक बुक, विविध रेशन कार्ड याशिवाय सेलडीड आणि स्टॅम्प पेपर जप्त केल्याची माहिती पलिसांनी दिली.

सुलेमान खानच्या पत्नीलाही होणार अटक

पोलिसांनी सुलेमान खानसोबत त्याची पत्नी अफ्साना हीला देखील ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफ्सानाला देखील एका जमीन घोटाळ्यात घटक होण्याची शक्यता आहे. म्हापसा येथील जमीन घोटाळ्यात तिचा सहभाग असल्याचे गुप्ता म्हणाले.

आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक याच्या मदतीने सुलेमान खान कोठडीतून फरार झाला होता. नाईक हुबळीत पोलिसांना शरण आला पण, सुलेमान फरारच होता. सुलेमानला मदत करणाऱ्या अमित नाईकला अटक करुन सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तसेच, हुबळीत सुलेमानला मदत करणाऱ्या हजरत अलीला देखील अटक करण्यात आली होती. दोघेही सध्या सशर्त जामीनावर बाहेर आहेत. तरीही सुलेमान मात्र पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला अटक करण्यात यश आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT