North Goa BJP Candidate Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Goa: उमेदवार बदलला नाही तर, पराभव निश्चित; गोव्यात भाजप उमेदवाराविरोधात मेसेज व्हायरल

North Goa BJP Candidate Shripad Naik: पंचवीस वर्ष खासदार व 5 वर्ष केंद्रात मंत्री असताना लोकसभेत आवाज उठवला नाही, असे म्हणत श्रीपाद नाईक यांचा 'मौनी बाबा' असा उल्लेख.

Pramod Yadav

North Goa BJP Candidate Shripad Naik

गोव्यात भाजपच्या दोन्ही उमेदवारांची अधिकृत घोषणा झाली आहे. उत्तरेत विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांना सहाव्यांदा उमेदवारी देण्यात आली असून, दक्षिणेत पल्लवी धेंपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

मतदानाची तारीख जवळ आली असताना उत्तर गोव्यातील भाजपच्या उमेदवारीबाबत काहीजण नाराज असल्याचा एक मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. एवढेच नव्हे तर उमेदवार बदलला नाही तर, भाजपचा पराभव निश्चित असल्याचे या संदेशात (पत्रक) म्हटले आहे.

भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यात उत्तर गोव्यातून विद्यमान खासदार श्रीपाद नाईक (भाऊ) यांना विक्रमी सहाव्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाऊ एक लाख मताधिक्याने विजयी होतील असा दावा भाजपकडून केला जात असताना, नाईक यांच्या विरोधात एक संदेश (पत्रक) समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

पंचवीस वर्ष खासदार व 15 वर्ष केंद्रात मंत्री असताना लोकसभेत आवाज उठवला नाही, असे म्हणत श्रीपाद नाईक यांचा 'मौनी बाबा' असा उल्लेख या व्हायरल पत्रकात केला आहे.

'फक्त दिल्लीत लोकांची उठबस करणे हे खासदाराचे काम नाही. एकदा निवडून आला की चार-चार वर्षे मतदार संघामध्ये दौराही नाही,' असा आरोप नाईक यांच्यावर पत्रकातून करण्यात आला आहे.

उत्तर गोव्यातील भाजपाचे बहुसंख्य नाराज कार्यकर्ते, भंडारी समाजातील असंख्य युवक, महिला व स्वाभिमानी गोमंतकीय यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या पत्रकात श्रीपाद नाईक यांच्याकडे प्रभावी वक्तृत्व नाही तरी सुधरण्यासाठी प्रयत्न केला नाही, असा आरोप करण्यात आलेला आहे.

यासह 'स्वतःच्या मुलाशिवाय कोणालाही नोकरी दिली नाही, स्वतःच्या मुलाशिवाय कोणालाही नोकरी दिली नाही, म्हादई नदी संदर्भात लोकसभेत आवाज उठवला नाही,' असे आरोप करण्यात आले आहेत.

समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या या पत्रकाच्या सत्यतेची अद्याप पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, पत्रकातून उपस्थित करण्यात आलेले प्रश्न आणि आरोप यावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT