Goa Congress: दक्षिण गोव्यातून युरी? उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेस नेत्यांना दिल्लीतून बोलावणे

Goa Congress Loksabha Candidate: लोकसभा उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसच्या हायकमांडने गोव्यातील नेत्यांना दिल्लीत बोलवले आहे.
Goa Congress Loksabha Candidate
Goa Congress Loksabha CandidateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress Loksabha Candidate

एक महिन्याच्या प्रदिर्घ चर्चेनंतर गोव्यातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिणेत भाजपचा चेहरा कोण असणार या चर्चांना रविवार पूर्णविराम मिळाला. पल्लवी धेंपे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केलीय.

भाजपच्या दोन्ही उमेदवारांची नावे समोर आल्यानंतर आता काँग्रेस उमेदवार निश्चितीसाठी घाई करताना दिसत आहे. उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसच्या हायकमांडने गोव्यातील नेत्यांना दिल्लीत बोलवले आहे.

भाजपने पहिल्या यादीत उत्तरेतून विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांना सहाव्यांदा उमेदवारी जाहीर केली. दक्षिणेत भाजपने पल्लवी धेंपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

भाजपनंतर आता काँग्रेस उमेदवार निश्चितेसाठी दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सोमवारी (दि.२५ मार्च) विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक समन्वयक आल्टन डिकॉस्ता दिल्लीला बोलवण्यात आले आहे.

काँग्रेसकडून दक्षिण आणि उत्तर गोव्यासाठी इच्छुकांची मोठी यादी समोर आली आहे. यात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Goa Congress Loksabha Candidate
Loksabha Election 2024 : नाव जाहीर होताच महिला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह! पल्लवी धेंपेंना जिंकून आणणारच

दक्षिण गोव्यात काँग्रेसकडून विरियेतो फर्नांडिस, विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच, दक्षिणेत कॅथलिक मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे नाव देखील समोर येत आहे.

तर, उत्तरेत माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, विजय भिके आणि ज्येष्ठ नेते सुनिल कंवठणकर यांची नावे समोर आली आहेत. दिल्लीत आज होणाऱ्या बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या नावावर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे.

दोन्ही मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे २७ मार्च रोजी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर जाहीर केली जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com