पत्रकार प्रमोद प्रभूगावकर Dainik Gomantak
गोवा

चंद्रकांत केणी यांच्‍या जयंतीनिमित्त रविवारी पुरस्‍कार वितरण साेहळा; ज्‍येष्‍ठ पत्रकार प्रमोद प्रभूगावकर यांचा सन्मान

माजी मुख्‍यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत हे यावेळी प्रमुख पाहुणे

सुशांत कुंकळयेकर

प्रसिद्ध पत्रकार आणि साहित्‍यीक स्‍व. चंद्रकांत केणी यांची ८९ वी जयंती रविवार २६ नोव्‍हेंबर रोजी साजरी करण्‍यात येणार असून यानिमित्त सायंकाळी ५ वा. मडगाव पालिका सभागृहात होणार्‍या कार्यक्रमात ज्‍येष्‍ठ पत्रकार प्रमोद प्रभूगावकर यांना चंद्रकांत केणी पत्रकारिता पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येणार आहे.

माजी मुख्‍यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत हे यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित रहाणार असून त्‍यांच्‍याच हस्‍ते हा पुरस्‍कार दिला जाणार आहे. साहित्‍यीक व माजी आयएएस अधिकारी अरविंद भाटीकर हे यावेळी प्रमुख वक्‍ते म्‍हणून हजर रहाणार आहेत.

स्‍व. केणी यांनी कोंकणी भाषा आणि गोव्‍याची संस्‍कृती वृद्धिंगत होण्‍यासाठी आजीवन कार्य केले. त्‍यांच्‍या या कार्याचा सन्‍मान म्‍हणून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजीत केला जातो. आणि स्‍व. केणी यांची तत्‍वे पुढे नेणार्‍या गोमंतकीय साहित्‍यीकाला त्‍या दिवशी त्‍यांच्‍या नावे पुरस्‍कार दिला जातो.

यापूर्वी हा पुरस्‍कार ज्‍येष्‍ठ पत्रकार सुरेश वाळवे आणि उदय भेंब्रे यांना देण्‍यात आला असून या दोन्‍ही पत्रकारांनी केणी यांच्‍या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता केली होती. पुरस्‍काराचे यंदाचे मानकरी प्रमोद प्रभुगावकर यांनीही आपली पत्रकारिता कारकिर्द केणी यांच्‍याच मार्गदर्शनाखाली केली होती. रविवारचा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्‍याचे कळविण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT