Goa CM Pramod Sawant Chandgad mla shivaji patil Dainik Gomantak
गोवा

महाराष्ट्राच्या आमदाराने गोवा मुख्यमंत्र्यांच्या पाया पडून घेतली गळाभेट; सावंतांकडून पाटलांचे अभिनंदन Video

Viral Video: चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढलेल्या शिवाजी पाटील यांच्या २४ हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला आहे.

Pramod Yadav

पेडणे: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गोवा विमानतळवर भेट झाली. आमदार पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्या पाया पडून गळाभेट घेतली. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबाबत सावंतांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पाटील - सावंत यांच्या भेटीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढलेल्या शिवाजी पाटील यांच्या २४ हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला आहे. भाजपने तिकिट नाकारल्यानंतर पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. यात त्यांचा दणदणीत विजय झाला आहे.

विजयानंतर शिवाजी पाटील आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पहिल्यांदाच भेट झाली. उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सावंत आणि पाटील यांची भेट झाली. भेटीचा व्हिडिओ शिवाजी पाटील यांनी फेसबुक अकाऊंवरुन शेअर केला आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची गोवा आतंरराष्ट्रीय विमानतळावर भेट झाली. यावेळी त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल माझे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी लागेल ती मदत करायला मी सदैव तत्पर आहे असेही सावंत यांनी यावेळी सांगितले, असे शिवाजी पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या चंदगड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी 24 हजार 134 मतांनी विजय मिळविला आहे. त्यांच्याविरोधात पाच तुल्यबळ उमेदवार रिंगणात होते.

चंदगड मतदारसंघात राजेश पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट), डॉ. नंदा बाभूळकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), मानसिंग खोराटे (जनसुराज्य शक्ती पक्ष), अर्जुन दुंडगेकर (वंचित बहुजन आघाडी), परशराम कुट्रे (संभाजी ब्रिगेड) रिंगणात होते. दरम्यान, शिवाजी पाटीलांनी सर्वच ठिकाणी आघाडी कायम राखत विजयी झाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी फडणवीसांची भेट घेत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT