Vasco Crime: बहिणीच्या रिलेशनशिपमुळे भाऊ नाराज; प्रियकरावर काचेच्या फुटक्या बाटलीने केले वार

Goa Police: पोलिसांत धाव घेत घडला प्रसंग कथन केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन संशयितास अटक केलीय.
Vasco Crime: बहिणीच्या रिलेशनशिपमुळे भाऊ नाराज; प्रियकरावर काचेच्या फुटक्या बाटलीने केले वार
Vasco Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: काचेच्या फुटक्या बाटलीने एकावर हल्ला केल्याची घटना वास्कोतून समोर आली आहे. याप्रकरणी बोगमाळो येथून वास्को पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या हल्ल्यात जखमी झालेला व्यक्ती बहिणीच्या प्रियकर असून, हल्लेखोर या रिलेशनशिपमुळे नाराज असल्याने त्याने हल्ला केल्याचे प्राथमिक तपास समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याप्रकरणी बोगमाळो येथून एकाला अटक करण्यात आली आहे. हल्लेखोराने तक्रारदार व्यक्तीला प्रथम मारहाण केली त्यानंतर काचेच्या फुटक्या बाटलीने अंगावर वार केले. यात तक्रारदार व्यक्ती जखमी झाला आहे. दरम्यान, त्याने पोलिसांत धाव घेत घडला प्रसंग कथन केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन संशयितास अटक केलीय.

Vasco Crime: बहिणीच्या रिलेशनशिपमुळे भाऊ नाराज; प्रियकरावर काचेच्या फुटक्या बाटलीने केले वार
Anjuna: E-Cigarettes च्या शॉपवर महिला आमदाराचा छापा; वेप, हुक्का दुकांनावर बंदीची मागणी

बहिणीच्या रिलेशनशिपमुळे नाराज

हल्लेखोर व्यक्ती बहिणीच्या रिलेशनशिपमुळे नाराज होता. बहिणीच्या प्रियकरावर केलेल्या हल्ला या नाराजीतून केल्याचा प्रथदर्शनी समोर आल्याचे पोलिसांनी म्हटलंय. दरम्यान, याप्रकरणी हल्लेखोराला अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Baina Sewage Pump Failure
 Mormugao Municipal Council Market Management
Soham Naik Bail Application
Vasco Dowry Harassment Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com