Accident Death Dainik Gomantak
गोवा

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Drunk Driving Accident: मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून जात असताना ताबा सुटून नाल्यात पडल्याने फरिदाबाद-हरयाणा येथील चंचल कुमार याचा मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: दारूची नशा एका ३० वर्षीय युवकाच्या जीवावर बेतली. मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून जात असताना ताबा सुटून नाल्यात पडल्याने फरिदाबाद-हरयाणा येथील चंचल कुमार याचा मृत्यू झाला. सां जुझे दी अरियाल येथील मुगाळी परिसरात ही घटना घडली.

अनैसर्गिक मृत्यू म्हणून मायणा-कुडतरी पोलिसांनी ही घटना नोंदवून घेतली आहे. पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर कामत पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.५) दुपारी १२.३० वा.च्या सुमारास रॉयल पॅराडाईज हॉलजवळील नाल्यात एक व्यक्ती पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मागाहून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, नाल्यात एकजण मृतावस्थेत सापडला. मागाहून त्याची ओळख पटली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत चंचल कुमार हा दारूच्या नशेत स्कूटरवरून जात असल्याचे समोर आले. त्यावेळी ताबा सुटल्याने तो नाल्यात पडल्याचा संशय आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. नंतर शवचिकित्सेनंतर डोक्याला झालेली दुखापत आणि नाल्यातील चिखलमिश्रित पाणी श्वासनलिकेत गेल्याने श्वासावरोध होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT