Chance of rain today in different places of Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात विविध भागात आज पावसाची शक्यता

यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार; हवामान खात्याने दिली माहिती

दैनिक गोमन्तक

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रातील वादळसदृश्य परिस्थिती आणि विदर्भाकडून कर्नाटकच्या दिशेने वाहत असलेल्या वार्‍यांमुळे हवामान खात्याने गोव्यातील विविध भागात आज पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात राज्यात अवकाळी पावसाने मोठ्याप्रमाणावर हजेरी लावली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दरम्यान, यंदाचा नैऋत्य मोसमी पावसाचा IMD ने अंदाज वर्तवला असुन संपूर्ण देशात नैऋत्य मोसमी पावसाचा (जून ते सप्टेंबर) पाऊस सामान्य असण्याची शक्यता आहे. यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

विदर्भ ते कर्नाटकापर्यंत वाऱ्याचा वेग तसेच दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात वार्‍याची उपस्थिती असल्याने, गोव्यात (Goa) 2 दिवस सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात 14 आणि 15 एप्रिलपर्यंत गडगडाटी पावसाची (Rain Update) शक्यता कायम राहील.

14 एप्रिल रोजी दोन्ही जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी ताशी 40-50 किमी वेगाने वाहणाऱ्या विजांचा आणि वाऱ्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. तसेच येत्या 4-5 दिवसात तापमानात कोणतीही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: शिवसेनेची शर्यत!

Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांचा ओघ कायम, मे महिन्यात 4.53% वाढ; 46.39 लाख पर्यटकांची नोंद

Curchorem: आता कुडचडेतील ओहोळात मृत मासे, कचरा प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याच्या परिणामाचा स्थानिकांचा आरोप

Goa Politics: उमेदवारीचे निकष, रणनीतीही ठरणार; भाजप राज्य कार्यकारिणीची आज बैठक

घाबरू नका, पुरेसा पाणीसाठा! 15 दिवस पाऊस नसला, तरी टंचाई भासणार नाही - सुभाष शिरोडकर

SCROLL FOR NEXT