Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: गोव्यात 'या' दिवशी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

राज्यातील तापमानात घट

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यातील तापमानात घट झाली असून, काही प्रमाणात का होईना नागरिकांना उष्म्यापासून दिलासा मिळत आहे.

येत्या काही दिवसांत कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होणार असून, 14 व 15 मार्च रोजी मेघगर्जनेसह काही भागांत तुरळक पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

राज्यातील हवामानात आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून, कोकण आणि कर्नाटक प्रांतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्‍यामुळे वातावरण ढगाळ असेल.

थंडीच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वातावरणात अचानक बदल जाणवू लागल्याने काही ठिकाणी सर्दी-तापाचे रुग्ण देखील वाढत आहेत.

गोव्यात आंबा, काजू हंगामाला सुरुवात झाली असून या हंगामाकरिता वाढती उष्णता हे वातावरण पोषक मानण्यात येते. मात्र ऋतू बदलामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

"पीओके तात्काळ खाली करा!" UN च्या मंचावरुन भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; मानवाधिकार परिषदेत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचे धुडकावले दावे

SCROLL FOR NEXT