Rain
Rain  Dainik Gomantak
गोवा

पुढील काही तासांत गोव्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यातील अनेक भागात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 4 तासांत दक्षिण गोव्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर गोव्यातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस ढगांच्या गडगडाटासह सुरू राहण्याची शक्यताआहे.(Chance of light to moderate rains in Goa in next few hours )

सद्या दक्षिण गोव्यातील अनेक तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. असेच वातावरण उत्तर गोव्यातील तालुक्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. पावसाचे ढग वायव्येकडून पश्चिमेकडे सरकत असून हेच वातावरण पुढील काही दिवस राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात 16 मे रोजी होणार आगमन

नैऋत्य मोसमी पावसाचं अर्थात मान्सूनचं अंदमानमध्ये अर्थात बंगालच्या उपसागरात 16 मे रोजीच आगमन झालं आहे. याशिवाय केरळमध्ये येत्या 17 मे रोजीच पावसाचं झोकात आगमन होणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र व तळ कोकणात या तारखेला मान्सून होणार दाखल

संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहात आहे, त्या मान्सूनचं महाराष्ट्रात नेमकं कधी आगमन होणार आहे, या बैठकीमध्ये राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी यंदा संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामूळे बळीराजाच्या कामांना आता वेग येणार आहे. कारण खरीप शेतीची पावसाळ्यापूर्वी असणारी कामे वेगाने पुर्ण करता येणार आहेत.

होसाळीकर यांनी बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, येत्या 5 जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. अंदमानमध्ये16 मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनचं केरळमध्ये 27 मे रोजी आगमन होण्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच यंदा मराठवाड्यामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT