Chamrakond River Bridge Dainik Gomantak
गोवा

Chamarkond Bridge: गोवा- महाराष्ट्राला जोडणाऱ्या पोर्तुगीजकालीन पुलाचे अस्तित्व धोक्यात? एका बाजूचा कठडा कोसळला

Chamrakond River Bridge: पुलावरून दरदिवशी शेकडो वाहनांची सतत रहदारी सुरू असते. पोर्तुगीज काळात या पुलाची बांधणी झाल्याने हा पूल भक्कम आहे असे वाटत असले तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे.

Sameer Panditrao

डिचोली: महाराष्ट्राला जोडणारा म्हावळींगेतील पोर्तुगीजकालीन ‘चामरकोंड’ पूल दिवसेंदिवस कमकुवत होत चालला असून, या पुलाच्या अस्तित्वाबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हा पूल मोडकळीस आला असून, सरकारने या पुलाचा गंभीरतेने विचार केला नाही, तर या पुलाच्या अस्तित्वावर संकट येण्याची शक्यता आहे. तशी भीतीही वाहनचालकांसह जागरूक नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी या पुलावर झालेल्या अपघातात या पुलाचा एका बाजूने कठडा कोसळलेला आहे.

त्यामुळे या पुलावरून वाहने सोडाच, पायी चालत जाणेही धोक्याचे बनले आहे. या पुलावरील संकट टाळण्यासाठी सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक महेश लक्ष्मण येंडे व इतरांनी केली आहे.

डिचोली आणि महाराष्ट्राला जोडणारा ‘चामरकोंड’ हा पूल वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा ठरत आहे. या पुलावरून दरदिवशी अवजड मिळून शेकडो वाहनांची सतत रहदारी सुरू असते. पोर्तुगीज काळात या पुलाची बांधणी झाल्याने हा पूल भक्कम आहे. असे जरी वाटत असले, तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. मध्यंतरी दोनवेळा किरकोळ डागडुजी सोडली, तर या पुलाची देखभाल करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आलेले नाही, अशी माहिती समोर आली आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल गुलदस्त्यात

सरकारने नियुक्त केलेल्या ‘स्टकवेल कन्सल्टन्ट’ या मुंबईस्थित सल्लागार कंपनीकडून उत्तर गोव्यातील जुनाट पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यात ‘चामरकोंड’ पुलाचाही समावेश होता. मात्र, अजूनतरी या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल गुलदस्त्यात आहे. हा पूल आता कमकुवत झाला असून, या पुलावरील संकट टाळण्यासाठी या पुलाची गंभीरपणे देखभाल करण्याची आवश्यकता आहे. कमकुवत झालेल्या या पुलाची डागडुजी करतानाच, समांतर पूल बांधावा, अशी मागणीही आता पुढे येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT