Saligao Theft Dainik Gomantak
गोवा

Saligao Theft: गोव्यात भरदिवसा चेन स्नॅचिंगचा थरार! सीसीटीव्हीत चोरट्याची करामत कैद; पोलिसांकडून शोध सुरु

Chain Snatching In Saligao: बुधवारी (25 डिसेंबर) सकाळी साळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पी़डीए कॉलनी परिसरात चेन स्नॅचिंगची एक खळबळजनक घटना घडली.

Manish Jadhav

साळगाव: गोव्यातील शांत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या रहिवासी भागात आता गुन्हेगारांनी आपले डोके वर काढले आहे. बुधवारी (25 डिसेंबर) सकाळी साळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पी़डीए कॉलनी परिसरात चेन स्नॅचिंगची एक खळबळजनक घटना घडली. एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून काही क्षणांत पळ काढला. या संपूर्ण घटनेचा थरार जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या व्हिडिओच्या आधारे पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जेव्हा नेहमीप्रमाणे नागरिक आपल्या कामासाठी बाहेर पडले होते, तेव्हा ही घटना घडली. पीडीए कॉलनी परिसरातील दुकानदार महिलेला लक्ष्य करण्यात आले. काही खरेदी करण्याच्या बहाणाने चोरटा दुकानात आला. तो या महिलेला बोलत असताना सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. मात्र संधी मिळताच त्याने अत्यंत वेगाने या दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली आणि प्रतिकार करण्याची संधी मिळण्यापूर्वीच पळ काढला.

सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्हेगाराचे धाबे दणाणले

चेन स्नॅचिंगच्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असले, तरी पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला आहे. ज्या ठिकाणी ही चोरी झाली, तिथल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला. फुटेजमध्ये चोरट्याचा चेहरा, त्याने वापरलेले वाहन आणि पळून जाण्याचा मार्ग स्पष्ट दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून तांत्रिक तपासाला वेग दिला आहे.

पोलीस तपास आणि खबरदारी

या घटनेची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांनी तातडीने दखल घेतली असून साळगाव पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, रस्त्यावरुन चालताना सतर्क राहावे आणि दागिने प्रदर्शनीय होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात (Goa) पर्यटकांची आणि लोकांची गर्दी वाढली आहे, अशा काळात गुन्हेगारांनी सक्रिय होणे ही चिंतेची बाब आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhausaheb Bandodkar: 'भाऊसाहेब बांदोडकर यांच्यामुळे गोव्याने सर्वच क्षेत्रांत यशस्वी झेप घेतली'; ढवळीकरांचे गौरवोद्गार

Fiscal Health Index: गोव्‍यासाठी खूशखबर! आर्थिक आरोग्‍य निर्देशांकात यंदा दुसरा क्रमांक; CM सावंतांनी केला अहवाल सादर

Goa Politics: खरी कुजबुज; फोंडा पोटनिवडणूक अजूनही ‘वेटिंग’वर

Goa Water Old Pipeline: 'जीर्ण पाईपलाईन बदलल्या जाणार'! मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती; पाणीचोरी, गळती रोखण्‍यासाठी ‘फ्‍लो मीटर्स’

Goa Public Transport: वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी गोव्यात 300 बसगाड्यांची गरज, डॉ. दिव्या राणे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT