Panaji Smart City Issue 
गोवा

Panaji Smart City Issue: ‘थर्ड पार्टी ऑडिट’साठी आम्ही तयार! स्मार्ट सिटीप्रश्‍नी सीईओ रॉड्रिग्स यांचे प्रत्युत्तर

महापालिकेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या कामांचे आर्थिक लेखा परीक्षण (ऑडिट) करण्याची मागणी नगरसेवक उदय मडकईकर यांनी केली होती. यावर ‘थर्ड पार्टी ऑडिट’साठी आम्ही तयार आहोत.

दैनिक गोमन्तक

Panaji Smart City Issue: महापालिकेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या कामांचे आर्थिक लेखा परीक्षण (ऑडिट) करण्याची मागणी नगरसेवक उदय मडकईकर यांनी केली होती. यावर ‘थर्ड पार्टी ऑडिट’साठी आम्ही तयार आहोत.

त्याचा खर्चही द्यायची आमची तयारी आहे, असे सांगत इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांनी थेट महापालिकेलाच प्रत्युत्तर दिले आहे.

गुरुवारी राज्य कर खात्याच्या परिषदगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत मडकईकर हे महापौर होते, तेव्हापासून बोलत आहेत. मागील काही बैठकांत त्यांनी स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारांना बोलावून त्याविषयी जाब विचारावा, अशी मागणीही केली होती.

पणजीत सर्वत्र मलनिस्सारण वाहिनीसाठी खोदकाम सुरू झाल्यानंतर वाहतुकीवर झालेला परिणाम, कंत्राटदाराकडून सुरक्षिततेची न घेतलेली काळजी पाहता त्यावर उत्पल पर्रीकर यांनी आवाज उठविला होता. त्यांनी संजीत रॉड्रिग्स यांना निवेदनही दिले होते. त्यानंतर महापौर रोहित मोन्सेरात आणि आमदार बाबूश मोन्सेरात हे कामांची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले.

मात्र, मोन्सेरात यांनी कामाच्या दर्जाविषयी हात ‘वर’ केले आणि सल्लागाराला त्याविषयी जबाबदार धरावे, असे सांगितले. नंतर स्मार्ट सिटीच्या कामांशी संलग्न असलेल्या महापालिकेत कामाच्या ऑडिटची मागणी झाली.

कामाचा लेखाजोखा

  • २०१५ : केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशन योजना अंमलात आणली.

  • २०१६ : पणजी शहराची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड. त्यासाठी ‘एसपीव्ही’ तयार केले.

  • २०१८ : ३५ प्रस्तावित प्रकल्पांपैकी ३ कामांचे आदेश दिले, ते एकूण प्रस्तावाच्या ३० टक्के होते.

  • २०२० : काहीही काम मार्गी लागले नाही.

  • २०२१ : विविध विभागांद्वारे प्रलंबित ३३ कामांचे कार्यादेश जारी केले. जे एकूण प्रस्तावाच्या ७० टक्के आहेत.

  • २०२२ : प्रमुख रस्ते आणि मलनिस्सारणाचे काम सुरू झाले.

  • २०२३ : एकूण प्रकल्पांतर्गत कामाची ७५ टक्के प्रगती

काय म्हणाले संजीत रॉड्रिग्स?

  • स्मार्ट सिटी मिशन खूप मोठे आहे आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून खूप कमी उंचीवर पणजी हे शहर वसले आहे.

  • त्यामुळे येथे काम करणे आव्हानात्मक आहे.

  • सध्या १८ जूनचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर महात्मा गांधी मार्गाविषयी निर्णय घेतला जाईल.

  • त्यासाठी हा मार्ग बंद करण्याचे ठरविले आहे.

  • डॉ. रॉकी डिसोझा रस्ता आणि डॉ. पी. शिवगावकर रस्त्याचे २६ जानेवारीपर्यंत पूर्ण होईल.

  • आत्माराम बोरकर आणि दादा वैद्य रस्त्यावरील मलनिस्सारण वाहिनीचे काम ३० जानेवारीपर्यंत पूर्ण होईल.

  • कर आयुक्त कार्यालयाजवळील मलनिस्सारण वाहिनीचे काम १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल.

स्मार्ट सिटीच्या कामांबाबत पावसाळ्यापासून संशय व्यक्त होत होता आणि आजही होत आहे. २०१५ पासून सुरू झालेल्या स्मार्ट सिटीच्या कामांना खऱ्या अर्थाने गतवर्षी गती मिळाली. त्यात १ जानेवारीला कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे मळ्यात अपघाती दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने या कामांविषयी महापौरांपासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कामांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्‍न उपस्थित केले.

त्याशिवाय कामाच्या दर्जाविषयी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी कोणतीही हमी घेणार नसल्याचे सांगून आपली बाजू सुरक्षित केली आहे. पावसाळ्यापूर्वी जी कामे झाली, त्यावेळी एकदाच पाणी साचण्याचा प्रसंग उद्‍भवला होता. त्यावरून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात स्मार्ट सिटीच्या कामांविषयी विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी स्मार्ट सिटीच्या कामांची श्‍वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली आहे. शिवाय काँग्रेसने दक्षता आयोगाकडेही तक्रार नोंदविली आहे. या सर्व प्रकारावरून थेट ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करायला आम्ही तयार आहोत, असे सांगून रॉड्रिग्स यांनी महापालिकेलाच आव्हान दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

SCROLL FOR NEXT