Goa Monsoon  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: सर्वच केंद्रांवर पावसाची शतकी खेळी! वाळपई, सांगे, साखळीत १५० पार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update

पणजी: राज्यात यंदा पावसाने नवनवीन विक्रम केले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक ४३८३ मिमी म्हणजेच १७२.५९ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. वाळपई, सांगे आणि साखळी येथे १५० इंचाहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

उत्तर गोव्यात ३६२५ मिमी म्हणजेच १४२.७१ इंच तर दक्षिण गोव्यात ३४४७.८ मिमी म्हणजेच १३५.७४ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ३५३१.१ मिमी म्हणजेच १३९ इंच पावसाची नोंद केली असून सरासरी पावसाच्या तुलनेत ३८.७ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात जून जुलैनंतर दमदार पाऊस बरसल्यानंतर ऑगस्ट महिन्यात काहीसा पावसाचा जोर मंदावला आहे गेल्यावर्षीचा ऑगस्ट हा सर्वाधिक उष्ण ऑगस्ट ठरला होता तशीच स्थिती यंदाही होण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. राज्यातील सर्वच केंद्रांवर पावसाने शतक पार केल आहे. मात्र सर्वात कमी पावसाची नोंद दाबोळी येथे करण्यात आली आहे. दाबोळी येथे २७२७.३ मिमी म्हणजेच १०७.३७ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मध्यम पावसाची शक्यता

गेल्या २४ तासांत राज्यात एकूण १२.८ मिमी इतक्या तुरळक पावसाची नोंद करण्यात आली असून म्हापसा येथे २९.८ मिमी, फोंडा २२ मिमी, सांखळी २०.४ मिमी, जुने गोवा १८.४ मिमी, पेडणे १३.८ मिमी, वाळपई १३.३ मिमी, मडगाव १२.२ मिमी, पणजी ११.८ मिमी, केपे १० मिमी, मुरगाव ९.४ मिमी, दाबोळी ७ मिमी, सांगे ६ मिमी, तर काणकोण २.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात मध्यम पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली असून यलो अलर्ट जारी केला आहे. आज पणजी येथे कमाल ३०.१ अंश सेलिअस तर किमान २६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: सुवर्णसंधी! तरुणांनो लागा तयारीला, 'या' सरकारी विभागात होणार मेगा भरती

Mandrem Panchayat: मांद्रेत डोंगरकापणी रोखणार! नवनिर्वाचित सरपंचांचा विश्वास

Margao News: पावसामुळे कोकण रेल्वे उड्डाणपुलावरील रस्ता परत खराब! नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची लोकांची मागणी

मुख्यमंत्र्यांचा निर्णय 'योग्य'! अभियंत्यांवरच्या कारवाई निर्णयावरून नागरिक समाधानी; पंप ऑपरेटर्सवरही लक्ष देण्याची मागणी

Social Media: ‘या’ 10 देशांतील लोक सोशल मीडियावर घालवतात सर्वाधिक वेळ; जाणून घ्या भारताचं स्टेटस

SCROLL FOR NEXT