Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

कर्करोग उपचारांसाठी अर्थसंकल्पात निर्णायक पाऊल, आरोग्यमंत्री राणेंकडून स्वागत; गोव्याच्या डॉक्टरांना अधिक संधींचा दावा

Vishwajit Rane: कर्करोग उपचारासाठी सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘डे केअर कॅन्सर सेंटर’ उभारण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

Sameer Panditrao

Central Budget 2025 cancer treatment and rare diseases healthcare expansion

पणजी: केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये कर्करोग उपचार, दुर्मीळ आजारांचे उपचार व वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारावर भर देण्यात आल्याचे स्पष्ट करून गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्याचे स्वागत केले व हा आरोग्य सेवा क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णय असल्याचे म्हटले आहे.

कर्करोग उपचारासाठी सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘डे केअर कॅन्सर सेंटर’ उभारण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. पुढील दोन वर्षांत हे केंद्र उभारले जाणार असून २०२५-२६ पर्यंत आणखी २०० नवीन कर्करोग केंद्रांची स्थापना केली जाईल.

यामुळे तृतीयक (टर्शरी) रुग्णालयांवरील भार कमी होईल आणि नागरिकांना त्यांच्या जवळच अत्याधुनिक उपचार मिळतील. या अर्थसंकल्पात ३६ अत्यावश्यक औषधांवरील कर पूर्णतः माफ करण्यात आला असून आणखी ६ जीवनावश्यक औषधांवर फक्त ५ टक्के कर लागू करण्यात आला आहे. यामुळे रुग्णांना महागड्या उपचारांचा खर्च झेपेल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्र मजबूत करण्यासाठी १०,००० नव्या वैद्यकीय प्रवेश जागा वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने आधीच वैद्यकीय प्रवेश संख्येत वाढ केली आहे. त्यामुळे गोव्याच्या युवा डॉक्टरांना अधिक संधी उपलब्ध होत आहे. या निर्णयामुळे देशातील आरोग्य सेवेसाठी अधिक तज्ज्ञ डॉक्टर तयार होतील. भविष्यात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

SCROLL FOR NEXT