Sudin Dhvalikar Dainik GOmantak
गोवा

Solar Energy: सौरऊर्जा प्रोत्साहनार्थ गोव्याला 8.77 कोटींचा निधी; मंत्री ढवळीकरांनी स्वीकारला धनादेश

Sudin Dhvalikar: पीएम सूर्य घर योजना आणि सरकारची इतर नूतन ऊर्जा क्षेत्रातील धोरणे आणि योजना भारताला पर्यावरणीय शाश्वततेकडे नेण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहेत.

Sameer Panditrao

पणजी: केंद्रीय नवीन व नवीनतम ऊर्जा मंत्रालयाने राज्य सरकारला ८.७७ कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी वितरित केला. मुंबई येथे काल (ता.९) झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी हा धनादेश केंद्रीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते स्वीकारला. विभागीय नवीनतम ऊर्जा कार्यशाळेच्या या कार्यक्रमाला केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे नवीनतम ऊर्जामंत्री मोरेश्वर दवे, गुजरातचे ऊर्जामंत्री कानुभाय देसाई हेही उपस्थित होते.

ढवळीकर यावेळी म्हणाले, पीएम सूर्य घर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार घराघरांमध्ये सौर उर्जेच्या वापराला उत्तेजन देण्यासाठी अनुदान आणि सहाय्य पुरवते, ज्यामुळे वीजेच्या खर्चात बचत होते आणि पर्यावरण संरक्षणास मदत होते. याशिवाय, नूतन ऊर्जा क्षेत्रात सरकार विविध आर्थिक उत्तेजना, कर सवलती आणि योजना उपलब्ध करून देत आहे. उदाहरणार्थ, ‘पंतप्रधान किसान उर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यामुळे शेतकरी सौर ऊर्जा निर्मिती करू शकतात आणि ती स्वतःच्या वापरासाठी वापरू शकतात. त्यामुळे भारताच्या उर्जा संक्रमणाला चालना मिळते आणि आर्थिक विकास व पर्यावरणीय शाश्वततेसाठी मदत होते.

पीएम सूर्य घर योजना आणि सरकारची इतर नूतन ऊर्जा क्षेत्रातील धोरणे आणि योजना भारताला पर्यावरणीय शाश्वततेकडे नेण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहेत. या योजनांच्या माध्यमातून वीजेचा खर्च कमी होतो, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते आणि पर्यावरणाची रक्षण केली जाते. सरकारच्या प्रयत्नामुळे भारतात सौर उर्जा क्षेत्राचे मोठे भविष्य आहे, असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

Hanuman Chalisa Video: ऐतिहासिक विक्रम! 'श्री हनुमान चालीसा' 5 अब्ज व्ह्यूज ओलांडणारा भारतातील पहिला व्हिडिओ; जागतिक यादीत समावेश

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गोव्याचा पहिल्या सामना उत्तर प्रदेशशी; रणजीच्या अपयशानंतर टी-20 मध्ये कामगिरी सुधारण्याचे आव्हान!

SCROLL FOR NEXT