Luizinho Faleiro
Luizinho Faleiro Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Issue: ...तरच कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवता येईल!

Akshay Nirmale

Mahadayi Water Issue: म्हादई नदीचे पाणी वापरण्याच्या कर्नाटक राज्याच्या प्रस्तावाच्या डीपीआरला केंद्रीय जल बोर्डाची परवानगी मिळाली असली, तरी प्रत्यक्षात हे काम मार्गी लावताना त्यांना पर्यावरणविषयक परीणामांचा अभ्यास (ईआयए) करावा लागेल.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच कर्नाटकला प्रकल्प मार्गी लावता येईल, असा खुलासा केंद्रिय जलशक्ती मंत्री बिस्वेस्वर तुडू यांनी केला आहे. खासदार लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविले तर त्याचे विपरीत पर्यावरणीय परिणाम गोव्यातील पाच तालुक्यावर आणि सहा अभयारण्यांवर होणार आहेत, याची मंत्रालयाला जाणीव आहे का, असा प्रश्न खासदार फालेरो यांनी विचारला होता. त्यावर तुडू यांनी हे उत्तर दिले.

म्हादई पाणी लवादाच्या आदेशानुसार कर्नाटकला कळसा प्रकलाप्तून 2.18 टीएमसी तर भांडुरा प्रकल्पातून 1.72 टीएमसी पाणी वळविण्याची परवानगी दिली आहे, अशी माहितीही या उत्तरात दिली आहे.

दरम्यान, म्हादई पाणी प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत 'म्हादई प्रवाह' या नावाने म्हादई पाणी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ट्विट करून दिली होती.

त्यानंतर केंद्राच्या या निर्णयाचे गोव्याच्या तसेच कर्नाटकच्याही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले होते. म्हादई प्रवाहचे कामकाज पणजीतून चालणार असून त्यासाठी केंद्राने मंजुरी दिल्याचेही गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News : धमकावून विवाहितेवर बलात्‍कार; पुराव्‍यांअभावी संशयित दोषमुक्‍त

Mapusa Urban Bank : आमचे पैसे आम्‍हाला परत करा! ‘म्‍हापसा अर्बन’च्‍या ठेवीदारांची आर्त हाक

Margao News : जनाधार कमी झाल्‍यानेच फळदेसाईंचे आरोप; सावित्री कवळेकर यांचा दावा

Mani Shankar Aiyar: ‘’पाकिस्तानची इज्जत करा, त्याच्याकडे अणुबॉम्ब...’’; सॅम पित्रोदा यांच्यानंतर मणिशंकर अय्यर बरळले

Siolim Water shortage : सागर उशाला; तरी कोरड पडलीय घशाला! आसगाव, शापोरावासीयांची व्यथा

SCROLL FOR NEXT