G. Kishan Reddy Mahua Moitra  Dainik Gomantak
गोवा

Old Goa Controversial Bungalow: जुने गोवे येथील वादग्रस्त बांधकाम पाडण्याचे निर्देश

केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांची तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रा यांना पत्राद्वारे माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Old Goa Controversial Bunglow: जुने गोवे येथील वादग्रस्त बंगल्याचे बांधकाम पाडण्याचे निर्देश पुराभिलेख सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय) ला देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना पत्राद्वारे दिली आहे.

यापुर्वी ऑगस्ट महिन्यात गोव्यातील तृणमुलचे राज्यसभेचे खासदार लुईझिन फालेरो यांना दिलेल्या लेखी उत्तरात जी. किशन रेड्डी यांनी म्हटले होते की, ही इमारत सेंट केजेटन चर्चच्या संरक्षित भागात आहे. त्यामुळे 'एएसआय'ने या प्रोजेक्टच्या प्रवर्तकाला कारणे दाखवा नोटीसही पाठवली आहे.

ओल्ड गोव्यातील अनधिकृत बंगल्याविरोधात स्थानिक नागरिकांनी 100 दिवसांहुनही अधिक काळ सत्याग्रह केला होता. हे बांधकाम पाडण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी पंचायतीकडे अनेकवेळा पाठपुरावाही केला होता.

ओल्ड गोवा (Old Goa) पंचायतीने यापूर्वीच संबंधित अनधिकृत बंगल्याच्या मालकाला नोटीस बजावली होती. तसंच हा अनधिकृत बंगला तातडीने पाडण्याचे आदेशही पंचायतीकडून नोटीसीमार्फत देण्यात आला होता. बंगल्यावर कारवाई होईपर्यंत स्थानिकांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. इमारत तोडेपर्यंत साखळी उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा इशाराही देण्यात आला होता.

टाऊन प्लॅनिंग मंत्री विश्वजीत राणे यांनी नॅशनल मॉन्युमेंट ऑथोरिटीने परवानगी दिल्यानंतरच त्यांच्या मंत्रालयाने परवानगी दिल्याचे स्पष्ट केले होते, पण त्यानंतरही आंदोलकांचे समाधान झालेले नव्हते.

दरम्यान, आता या वादग्रस्त बंगल्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. एएसआयला हा बंगला पाडण्याचे निर्देश दिले गेले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार मोईत्रा या तृणमुल काँग्रेसच्या गोवा प्रभारी आहेत. मोईत्रा यांनी यापुर्वी जुन्या गोव्यातील अवैध बांधकामांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच त्यांनी निवडणूक काळात केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यावर आऱोपही केले होते.

रेड्डी यांनी गोवा ही यापुर्वीच कॅसिनो कॅपिटल बनल्याचे एका भाषणात म्हटले होते. त्यावरून मोईत्रा यांनी अशा वक्तव्यातून सत्ताधारी भाजपच्या नेत्यांची मानसिकता दिसून येत असल्याची टीका केली होती. गोव्यातील लोकांना चांगले आयुष्य जगण्यासाठी चांगल्या क्षेत्रातील नोकऱ्या हव्या आहेत, असे त्या म्हटल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT