Central Jail Of Goa: चक्क! दीड वर्षापूर्वी पॅरोलवर सुटलेला कैदी अजूनही फरार

Central Jail Of Goa: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील भोंगळ कारभाराचा आणखी एक सशक्त नमुना समोर आला आहे.
Central Jail Of Goa
Central Jail Of GoaDainik Gomantak

Central Jail Of Goa: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील भोंगळ कारभाराचा आणखी एक सशक्त नमुना समोर आला आहे. कोरोना काळात दीड वर्षापूर्वी पॅरोलवर सुटलेला कैदी अद्याप कारागृहात परतला नसल्‍याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जनक विशू कर्मा असे या कैद्याचे नाव आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, 21 दिवसांच्या पॅरोलवर जनक विशू कर्मा याला कारागृहातून सोडण्‍यात आले होते. पण तो अद्याप न परतल्‍याने त्‍याच्‍याविरोधात साळगाव पोलिस स्थानकात कारागृह अधीक्षकांनी तक्रार दाखल केली आहे.

Central Jail Of Goa
Goa News: क्रिकेट निवडणुकीतही रंगला राजकीय फड!

वास्को पोलिसांनी आरोपी कर्मा याला 2015 साली बलात्कारप्रकरणी अटक केली होती. सुनावणीनंतर 2018 मध्ये न्यायालयाने त्याला 10 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा, 2 लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

साळगावमधील पत्ता

कालांतराने कोरोना महामारी नियंत्रणात आल्यावर पॅरोलवर सुटलेले इतर कैदी परतले. परंतु जनक विशू कर्मा माघारी न परतल्याने त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्‍यात आलेली आहे. कारागृहातून जाण्‍यापूर्वी त्‍याने साळगाव येथील पत्ता दिला होता. त्‍यामुळे साळगाव पोलिसांनी त्‍याच्‍यावर गुन्हा नोंद केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com