Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway: Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Highway: नितीन गडकरींनी घेतली जबाबदारी; म्हणाले- मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार...

डिसेंबरपर्यंत महामार्ग पूर्ण करण्याचा विश्वास; आयुष्यात सर्वाधिक बैठका याच रस्त्यासाठी घेतल्या...

Akshay Nirmale

Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway: गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. सध्याही या महामार्गाचे काम सुरू आहे. तथापि, अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे तसेच त्यासाठीच्या आंदोलनांमुळे, विविध अपघातांमुळे हा महामार्ग सतत चर्चेत असतो.

दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महार्माग पूर्ण होण्यास विलंब झाला आहे, याची कबुली देत त्याला ते स्वतःच जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे.

सकाळ माध्यम समुहाकडून आयोजित कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांची मुलाखत घेतली.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम इतकी वर्षे का रखडले या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, "पहिली गोष्ट म्हणजे महामार्ग झाला नाही त्याला मीच जबाबदार आहे. याची जबाबदारी मी दुसऱ्यावर ढकलंत नाही.

कोकणातील नदीवरील पूल वाहून गेला, त्यानंतर तो आम्ही आठ-नऊ महिन्यात पूर्ण केला. खरं म्हणजे हा महामार्ग जर आधीच पूर्ण झाला असता तर हे लोकही मृत्यू पावले नसते.

पहिल्यांदा हा महामार्ग महाराष्ट्र सरकारकडं दिला होता. त्यावेळी छगन भुजबळ मंत्री असताना त्यांनी टेंडर काढून याची कामं दिली. त्यातले कॉन्ट्रॅक्टर बदलले, पुरेशा अडचणी आल्या. जागा अधिग्रहणाला अजूनही अडचणी येत आहेत.

पण ज्या काही अडचणी आणि समस्या आल्या असतील त्याला मी इतर कोणालाही जबाबदार धरत नाही.

सर्वाधिक मीटिंग्ज

मंत्री गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गासाठी मी माझ्या आयुष्यात सर्वाधिक बैठका घेतल्या. जवळपास 75 ते 80 बैठका झाल्या असतील तरीही मला यश मिळालं नाही. पण याचं वर्षी डिसेंबर महिन्याच्या आत हा मुंबई-गोवा रस्ता पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

Ranji Trophy 2025: हुर्रे! गोव्याची दणदणीत विजयी ‘दिवाळी’, चंडीगडला नमवले; पाहुणा 'ललित' सामन्याचा मानकरी

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

SCROLL FOR NEXT