Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

''गोव्यातील क्रूझ पर्यटनासाठी केंद्र सरकार सकारात्मक''

मुरगाव बंदर विकासासाठी गतीने पावले उचलणार - केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात क्रूझ पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘सागारमाला’ प्रकल्पाअंतर्गत मुरगाव बंदराचा विकास करण्यासाठी १२४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे केंद्रीय राज्य पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. (Central government positive for cruise tourism in Goa )

श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली काल मुरगाव बंदर अधिकारिणीच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मुरगाव बंदर अधिकारिणीचे उपाध्यक्ष एम. गुरुप्रसाद राय, अधिकारिणीचे प्रमुख अभियंता सुरेश एस. पी. पाटील, रहदारी व्यवस्थापक कॅप्टन हिमांशू शेखर, गोवा पर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई आदी अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय बंदर,जहाजोद्योग व जलवाहतूक, पर्यटन मंत्रालय आणि गोवा सरकार गोव्यातील सागरी पर्यटन कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्नशील आहे. क्रूझ पर्यटन वाढीसाठी गोव्यात खूप वाव आहे. आणि त्या अनुषंगाने मुरगाव बंदर विकसित करण्यात येत आहे, असे श्री. नाईक यांनी नमूद केले.

मुरगाव बंदर हे देशातील सर्वांत जुन्या बंदरांपैकी एक असून1885 साली हे बंदर कार्यान्वित झाले. खनिज वाहतुकीवर हे बंदर अधिकतर अवलंबून होते. खाण व्यवसाय बंद झाल्यापासून या बंदरातील व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. तथापि, क्रूझ जहाजांसाठी हे बंदर एक आदर्श ठिकाण मानले जाते. क्रूझ पर्यटन सुरू झाल्यावर बऱ्याच लोकांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा आहे.

क्रूझ पर्यटनावर बैठकीत दीर्घ चर्चा

क्रूझ पर्यटन हा केंद्रबिंदू ठेऊन या पर्यटनाशी निगडित अनेक बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुरगाव बंदर अधिकारिणीला येणाऱ्या अडचणी, क्रूझ पर्यटनाला लागणाऱ्या साधन-सुविधांवर दीर्घ चर्चा या बैठकीत झाली. एस. गुरुप्रसाद राय यांनी विकसित करण्यात येणारे मुरगाव बंदर कशा स्वरूपाचे असेल यावर सादरीकरण केले. त्यावर सविस्तरपणे चर्चाही करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT