पणजी: केंद्र सरकारच्या २० कलमी कार्यक्रमाअंतर्गत मिळालेले १३८१ भूखंड लाभार्थ्यांनी विकल्याचे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता.
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये गरिबी निर्मूलनासाठी २० कलमी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात वस्तूंच्या किमती घटवणे, छोटे शेतकरी, कामगार यांच्या कर्जवसुलीला आळा घालण्यासाठी कायदा आणणे, सरकारी खर्चात कपात करणे, गावपातळीवरच्या लोकांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे, गरिबांना घरांसाठी भूखंड देणे आदींसारखे मुद्दे होते.
या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील किती नागरिकांना भूखंड मिळाले?, ज्यांना भूखंड मिळाले, त्यातील किती जणांनी त्यांची विक्री केली? हा कार्यक्रम राज्यात सध्या सुरू आहे का? असे प्रश्न आमदार शेट्ये यांनी विचारले होते. त्यावरील उत्तरात २० कलमी कार्यक्रमाअंतर्गत भूखंड मिळवण्यासाठी ४४६५ जणांनी अर्ज केलेले होते.
परंतु ५१७० जणांना भूखंड देण्यात आले. त्यातील १३८१ जणांनी त्यांची विक्री केल्याचे मंत्री मोन्सेरात यांनी सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. दरम्यान, २० कलमी कार्यक्रम योजनेची सध्या राज्यात अंमलबजावणी होत नाही. पुढील प्रक्रिया सरकारकडून सुरू आहे, असेही मंत्री मोन्सेरात यांनी म्हटले आहे. २० कलमी कार्यक्रमाअंतर्गत आलेले अर्ज व मिळालेले भूखंड
तिसवाडी ७०० ३६८
बार्देश १,९२२ १,१७४
सत्तरी ६४७ ६२०
पेडणे ३४४ २५५
डिचोली ४०९ ३७७
मुरगाव ० २०
फोंडा ० ४७४
सासष्टी ४२२ ५०१
काणकोण २१ २७५
सांगे ० ३४८
केपे ० ३३३
धारबांदोडा ० ४२५
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.