Mid day meal Dainik Gomantak
गोवा

Goa Forward Party: 'मिड डे मिल' योजनेचा निधी केंद्राने यापूर्वीच गोव्याला पाठविला- गोवा फॉरवर्ड

गोवा फॉरवर्डकडून केंद्र सरकारची पत्रे सादर : शिक्षण संचालक खोटे बोलत असल्याचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Mid day meal केंद्र सरकारकडून अजून निधी न आल्याने 'मिड डे मिल' योजनेखाली शाळांना आहार पुरविणाऱ्या स्वयंसेवी गटांना पैसे दिले नाहीत हे शिक्षणं संचालक शैलेश झिंगडे यांनी दिलेले स्पष्टीकरण पुर्णतः दिशाभूल करणारे असून केंद्र सरकारने आपला वाटा यापूर्वीच गोवा सरकारला दिला असल्याचा दावा गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केला आहे.

या स्वयंसेवी गटाची थकित असलेली 3.75 कोटींची थकबाकी लवकरात लवकर फेडावी अशी मागणी करणारे पत्र काल कामत यांनी मुख्य सचिवांना पाठविले होते. त्यांनतर शिक्षणं संचालकांनी खुलासा करताना केंद्राकडून रक्कम आल्यावर स्वयंसेवी गटांची थकबाकी फेडली जाईल अशी माहिती दिली होती.

केंद्रीय शिक्षणं खात्याकडून गोवा सरकारला जी पत्रे आली होती त्याच्या प्रती प्रसारमाध्यमांना सादर करीत कामत म्हणाले, प्रधानमत्री पोषण शक्ती निर्माण या योजनेखाली केंद्रीय शिक्षणं मंत्रालयाने गोवा शिक्षणं खात्याला 6 सप्टेंबर 2022 रोजी 7.94 कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाठविलाय.

15 फेब्रुवारी 2023 रोजी 7.36 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता पाठविला आहे. या पत्रांच्या प्रती आमच्याकडे आहेत असे असताना शिक्षण संचालक केंद्राकडून निधी आलाच नाही असे कसे म्हणतात असा सवाल त्यांनी केला.

हे सरकार निधीचा उधळपट्टी करत आहे. खिशात दमडी नसताना सरकार इव्हेंट साजरे करत आहे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत चार्टर विमाने घेऊन फिरत आहेत. पण विद्यार्थ्याना आहार पुरविणाऱ्या स्वयंसेवी गटांना देण्यास त्यांच्याकडे पैसे नाहीत ही शरमेची गोष्ट असे कामत यांनी म्हटले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT