Central Bank Of India's Manager Arrested In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Central Bank Of India's Manager Arrested In Goa: याप्रकरणात सुरुवातील अटक करण्यात आलेल्या तन्वी वस्तने अनेकांना टोप्या घातल्या आहेत.

Pramod Yadav

केपे: कुडचडे येथे ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करून साडेपस्तीस लाखांचा घोटाळा केल्याप्रकरणी कुडचडे पोलिसांनी काल तन्वी वस्त (कुडचडे) हिला अटक केल्यानंतर काल रात्री उशीरा कुडचडे पोलिसांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक आनंद जाधव यांना अटक केली आहे. त्यांना मंगळवारी (२६ नोव्हेंबर) केपे न्यायालयापुढे हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल २५ रोजी रोझालिना कोरीया अँथनी डायस, वोडलेमोल काकोडा यांनी तन्वी वस्त यांनी फसवून सेंट्रल बँकेत बोलावून आपल्या सुमारे पंचवीस लाख रुपयांच्या सोन्याच्या वस्तू बदलून त्याठिकाणी खोट्या वस्तू ठेवून आपली फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.

तसेच आणखी एकाने ५५ हजार रुपये हडप केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार काल २५ रोजी तन्वी हिला अटक केली होती, तसेच या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापकसुद्धा या प्रकरणात सहभागी असल्याने काल रात्री त्यांना पोलिसांनी अटक केली.

तन्वी वस्तने अनेकांना घातल्या टोप्या

याप्रकरणात सुरुवातील अटक करण्यात आलेल्या तन्वी वस्त हिने अनेकांना टोप्या घातल्या आहेत. हातचलाखी करुन दागिन्यांची आदलाबदली करुन लाखो रुपये लुटल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. तन्वीने सुमारे साडेपाच लाख रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग करुन घेतले. सेंट्रल बँक ऑफ इंडियात तन्वी हेल्पर म्हणून काम करायची यावेळी तेथे येणाऱ्या वृद्ध लोकांना तिने टार्गेट करत फसवणूक केली. यात एका कॅन्सर रुग्णाचा देखील समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानावर अपघात! थ्रोचा निशाणा चुकला अन् फलंदाजाला दुखापत; खेळाडूला स्ट्रेचरवरून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

Asia Cup Trophy Controversey: 'मोहसिन नक्वींनी जे केलं ते एकदम बरोबर...'; सूर्यकुमार यादवला अपशब्द बोलणारा पाक क्रिकेटपटू पुन्हा बरळला

Goa Murder Case: प्रियकरासाठीच आईने पोटच्या गोळ्याचा गळा घोटला; रुग्णालयात नेले म्हणून प्रकरणाला वाचा फुटली

Viral Video: फोन चोरीपासून वाचवण्याचा तरुणाचा 'Z+ सिक्युरिटी' फॉर्म्युला, ट्रेनमधील अतरंगी व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "भावाला कशाचीच भीती नाही..."

T20 World Cup 2026: 'टी20 वर्ल्ड कप'साठी सर्व 20 संघ निश्चित; नेपाळ, ओमाननंतर जपानला हरवून यूएईनं तिकीट केलं पक्क; पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT