Jennifer Monserrate and Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

जेनिफर मोन्सेरात यांचा पराभूत विरोधकांच्या घरासमोर जल्लोष

ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचा व्हिडीओ व्हायरल, टीकेची झोड

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत ताळगाव मतदारसंघात भाजपच्या तिकीटावर जेनिफर मोन्सेरात यांनी विजय मिळवला आहे. मात्र आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करताना जेनिफर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पराभूत विरोधकांच्या घरासमोर जाऊन जल्लोष केल्याने आता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांच्या पत्नी गोव्यातील भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे विजयानंतर जेनिफर यांच्याकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा होती. मात्र कार्यकर्त्यांसोबत जेनिफर यांनी विरोधकांच्या घरासमोर जाऊन फटाके फोडले, त्यानंतर मोठ्या आवाजात गाणी लावून जल्लोष केला. त्यामुळे ताळगाव परिसरात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जेनिफर (Jennifer Monserrate) यांच्या जल्लोषामुळे ताळगाव परिसरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनचालकांनीही नाराजी व्यक्त केली. तसंच मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याने ध्वनी प्रदूषणासह हवेचही प्रदूषण झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र हे सर्व होताना पोलीस प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान बाबूश मोन्सेरात यांनी भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी जेनिफर मोन्सेरात यांना ताळगावात मदत न केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे जेनिफर यांचा जल्लोष नेमका विरोधकांसाठी होता की सहकार्य न करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी अशी चर्चाही ताळगाव परिसरात सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT