Lineman Day Celebration Dainik Gomantak
गोवा

आमोणे उपवीज केंद्रावर ‘लाईनमन’ दिन साजरा

वीज कर्मचाऱ्यांचा गौरव: स्वसुरक्षा राखून प्रामाणिक सेवेची दिली शपथ

दैनिक गोमन्तक

साखळी: नावेली - साखळी येथील 220/33/11 केव्ही आमोणे उपवीज केंद्रावर आज ‘लाईनमन’ दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उप विभाग - 2, थिवी येथील सर्व विद्युत खात्यातील कामगार उपस्थित होते. सर्व कामगारांना स्वसुरक्षा राखून लोकांना प्रामाणिक सेवा देण्याची शपथ देण्यात आली. तद्‍नंतर सर्वांचा गुलाब व स्मतिचिन्ह देहून गौरव करण्यात आला.

असा कार्यक्रम प्रथमच खात्याने आयोजित केल्यामुळे सर्व कामगारांनी खात्याचे आभार मानले. तसेच असा कार्यक्रम आयोजित करण्याने सर्व कामगारांनी एक उत्साह वाढला आहे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. कोरोना काळात वेगवेगळ्या खात्यात कोरोना वॉरियर म्हणून सत्कार करण्यात आला होता, पण विद्युत खात्यातील कामगारांना अशाप्रकारचा सन्मान आता देण्यात आल्यामुळे सर्व कामगार खूष होते.

यावेळी व्यासीठावर कार्यकारी अभियंते रॉबर्ट नोरोन्हा, साहाय्यक अभियंते राजेश नाईक, कनिष्ठ अभियंते विष्णू वझे व प्रितेश गावस उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण कार्यकारी अभियंत्याने केले व तद्‍नंतर कनिष्ठ अभियंते विष्णू वझे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहाय्यक अभियंते राजेश नाईक यांनी केले, तर कनिष्ठ अभियंते प्रितेश गावस यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: कोण कुणाला मतदान करतो?

VIDEO: पाकड्यांच्या क्रिकेटचा खेळखंडोबा! वाऱ्याच्या एका झटक्यानं पीचवरील कव्हर्स उडाले अन् ग्राऊंड्समनही तोंडावर पडले, पाहा व्हिडिओ

Russian Military Plane Crash: संपर्क तुटला अन् क्षणातच होत्याचं नव्हतं झालं! रशियाचं 'An-26' लष्करी विमान क्रिमियात कोसळलं; 29 जणांचा जागीच मृत्यू

GCA Premier League: शंतनू नेवगी, यश कसवणकर यांची धडाकेबाज शतके; अनुभवी फिरकी गोलंदाज दर्शनचे पुन्हा डावात पाच बळी

Khelo India Tribal Games: गोव्याच्या मानसीला गोळाफेकीत सुवर्ण, 'खेलो इंडिया आदिवासी' स्पर्धेत वैभव गावकरला उंच उडीत 'रौप्यपदक'

SCROLL FOR NEXT