Ceiling Fan Falls on Student at Govt Primary School in Poriem Dainik Gomantak
गोवा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Poriem, Sattari Goa News: फॅन मुलीच्या अंगावर पडल्याने ती जखमी झाली आहे. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pramod Yadav

सत्तरी: सरकारी शाळेत शिकवणी सुरु असताना सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनींच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली आहे. यात इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणारी मुलगी जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अलिकडेच या सरकारी शाळेची दुरुस्ती करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्ये – सत्तरी येथील सरकारी शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकवणी सुरु असताना सिलिंग फॅन खाली कोसळला. फॅन तुटून खाली कोसळ्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. फॅन मुलीच्या अंगावर पडल्याने ती जखमी झाली आहे. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी मुलीला उपचारासाठी सुरुवातीला साखली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला म्हापसा येथील अझिलो रुग्णालयात हलविण्यात आले आहे. फॅन कसा आणि का तुटला याबाबत शाळा प्रशासन तपास करत आहे. दरम्यान, मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, पर्ये – सत्तरी येथील या सरकारी शाळेचे काही दिवसांपूर्वीचे दुरुस्तीकाम करण्यात आले होते. दुरुस्तीनंतर देखील फॅन खाली कसा कोसळला याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT