Sawantwadi Crime: इन्सुली नाक्यावर 94 लाख तर, वेर्ले गावात 22 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त

Sawantwadi Crime News: गोव्यातून कंटेनरद्वारे गोवा बनावटीच्या दारुची तस्करी केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
Liquor Seized In sindhudurg
LiquorDainik Gomantak
Published on
Updated on

सावंतवाडी: गोव्यातून महाराष्ट्रात अवैध पद्धतीने दारुची तस्करी सुरुच आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सावंतवाडी तालुक्यात दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत ९४ लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. उत्पादन शुल्क विभागाने इन्सुली तपासणी नाका आणि वेर्ले गावात ही कारवाई केली.

इन्सुली तपासणी नाक्यावर केलेल्या कारवाई रामनिवास (२५, रा. बाडमेर – राजस्थान) आणि नूर आलम (२६, प्रतापगड, उत्तर प्रदेश) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत ९३ लाख ६० हजार रुपयांची दारु आणि १५ लाख किंमतीचा कंटेनर, मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ०८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Liquor Seized In sindhudurg
Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

तसेच, वेर्ले – गावठणवाडी आणि झेंगाटवाडी येथे केलेल्या कारवाईत कृष्णा राऊळ आणि राजेंद्र तुकाराम राऊळ यांना ताब्यात घेतले आहे. उत्पादन शुल्क विभागाने राऊळ यांच्या घरावर छापा टाकून गोवा बनावटीची दारु जप्त केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Liquor Seized In sindhudurg
Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

कंटेनरमधून दारु तस्करी

गोव्यातून कंटेनरद्वारे गोवा बनावटीच्या दारुची तस्करी केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार इन्सुली तपासणी नाक्यावर पथकाने सापळा रचला होता.

संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यात गोवा बनाटीची दारु आढळून आली. पोलिसांनी दारुसाठ्यासह कंटेनर जप्त करत संशयितांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com