CCTV Cameras and WIFI on Joy Of Circle Dainik Gomantak
गोवा

जॉय ऑफ सर्कलवर सीसीटीव्ही कॅमेरे, व्हाय-फाय सुविधा; आमदार ग्लेन टिकलो यांच्या हस्ते उद्घाटन

सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मोफत व्हायफाय सुविधांनी युक्त सुशोभिकरण केलेल्या तार-बस्तोडा जंक्शनचे अखेर माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्या हस्ते दिवाळीच्या पूर्वसंध्येस उद्घाटन झाले.

Kavya Powar

CCTV Camera on Tar Junction: वाहनांची कोंडी लक्षात घेऊन वाहतूक बेट उभारुन तिथे सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मोफत व्हायफाय सुविधांनी युक्त सुशोभिकरण केलेल्या तार-बस्तोडा जंक्शनचे अखेर माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्या हस्ते दिवाळीच्या पूर्वसंध्येस उद्घाटन झाले. हे जंक्शन आता जॉय ऑफ सर्कल या नावाने ओळखले जाईल.

या उद्घाटन समारंभावेळी झेडपी सदस्या मनीषा नााईक, बस्तोडा सरंपच सुभाष मोरजकर, उसकई सरपंचा रिचा साळगांवकर, मयचे सरपंच सागर नाईक, नास्नोडा सरपंच सागर नाईक, म्हापसा पालिकेचे नगरसेवक प्रकाश भिवशेट, माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो व इतर पंचसदस्य उपस्थित होते. या सर्कलचे सुशोभिकरण हे सीएसआर योजनेतंर्गत करण्यात आले आहे.

या सर्कलवरुन वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. परिणामी, वाहतूकीचा बोजवारा उडायचा. त्यामुळेच स्थानिक बस्तोडा पंचायतीने या सर्कलचे सुशोभीकरण करुन इथे वाहतूक बेट उभारले. तसेच लोकांना इथे मोफत व्हायफाय सुविधा उभारली आहे. त्यामुळे बस्तोडा पंचायत शाब्बाकीस पात्र असल्याचे माजी आमदार ग्लेन टिकलो म्हणाले. तसेच, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे अपघात किंवा चोरांवर नजर ठेवण्यास उपयोग होईल.

टिकलो पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच काहींनी याठिकाणी सर्कलची पाहणी केली. कारण, इथे पाची साचत असल्याने बस्तोडा पंचायतीस संबंधितांनी लक्ष्य केले. परंतु, पंचायतीकडे प्रयत्न चालूच आहेत. मात्र, पावसाळा संपल्यानंतर अशा पाहणीला उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी अप्रत्यक्ष आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांच्यावर निशाणा साधला.

सरपंच सुभाष मोरजकर यांनी या वाहतूक बेटाचे महत्त्व तसेच माजी आमदार टिकलो यांनी दिलेल्या विशेष सहकार्‍यांबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.

या सर्कलवर दुभाजकसह वाहतूक बेट, फुटपाथ उभारली असून सुमारे ३० लाख रुपये खर्च करण्यात आलाय. तसेच वाहतूक बेटावर पारंपरिक खेळांचे दर्शन घडवणारे मुलांचे पुतळे बसविलेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT