माझ्या प्रयत्नांमुळेच सरकारला जाग! कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील घातक कचरा साफ करण्यासाठी अखेर निधी मंजूर: युरी आलेमाव

प्रदूषणाच्या समस्येवर कायम तोडगा निघाल्याशिवाय मी शांत बसणार नाही; युरी आलेमाव यांचा निश्चय
Yuri Alemao slams goa government
Yuri Alemao slams goa government Dainik Gomantak
Published on
Updated on

Yuri Alemao slams goa government

माझ्या अथक प्रयत्नांनी अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील घातक कचरा साफ करण्यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला 5 कोटी मंजूर करण्यास भाग पाडले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित अधिकारणीला आवश्‍यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाला आळा घालून कुंकळ्ळीवासीयांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी ठोस कृती करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

Yuri Alemao slams goa government
New Zuari Bridge: नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होणार; मंत्री नीलेश काब्राल यांची माहिती

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी कुंकळ्ळी मधील घातक कचरा साफ करण्यासाठी सरकारकडून मंजूरी पत्र प्राप्त झाल्याचे आज जाहिर केल्याने त्यावर प्रतिक्रिया देताना, युरी आलेमाव यांनी आपण प्राधिकरणाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे.

मी पूर्णपणे कुंकळ्ळीच्या जनतेसोबत असून जोपर्यंत प्रदूषणाचा प्रश्न कायम सुटत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असा इशारा दिला आहे.

माझ्या अथक प्रयत्नांनंतर व सातत्याने आवाज उठविल्यानंतर गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाला कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीचे प्रदूषण ऑडिट करण्याची जाग आली. परंतू सदर कृती लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचा प्रकार ठरू नये.

ऑरेंज फॉक्स इंडस्ट्री कशी बंद केली गेली आणि अवघ्या काही दिवसांनी ती परत सुरु झाली हे कुंकळ्ळीची जनता विसरलेली नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारने फसवणुकीचे धोरण अवलंबविल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे लक्षात घ्यावे, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.

हवा आणि जल प्रदूषण आणि कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील बेकायदेशीरता आणि अनियमितता नियंत्रित करण्यासाठी जबाबदार असलेल्या सरकारी प्राधिकरणांचा एकूण दृष्टिकोन आजपर्यंत संशयास्पद आढळला आहे.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई आणि कडक उपाययोजनांवर सरकारने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील अनियमिततेवर कारवाई करण्यासाठी उद्योग खात्यानेही सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे. उद्योग मंत्री मॉविन गुदिन्हो यांना औद्योगिक आस्थापनांकडून होणारे उल्लंघन नियंत्रित करण्यासाठी आणि थांबवण्यासाठी विविध सरकारी विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी नोडल एजन्सी स्थापन करण्याचा विसर पडलेला दिसतो.

सरकारने मला विधानसभेत सदर नोडल एजंसी स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते याची आठवण युरी आलेमाव यांनी करुन दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com